ना कॉल करता येणार ना चॅट! तुमची एक चूक आणि कायमचं बंद होईल WhatsApp अकाऊंट
व्हॉट्सॲप जगातील सर्वाधिक वापरलं जाणार मॅसेजिंग ॲप आहे. व्हॉट्सॲपचे जगभरात करोडो युजर्स आहेत. व्हॉट्सॲपने त्यांच्या युजर्ससाठी काही अटी ठेवल्या आहेत, जर या अटींचं तुम्ही पालन केलं नाही, तर तुमचे व्हॉट्सॲप अकाऊंट कायमचं बॅन होऊ शकतं. आता देखील कंपनीने लाखो असे व्हॉट्सॲप अकाऊंट बॅन केले आहेत, जे व्हॉट्सॲपच्या नियमांचे उल्लंघन करत होते. सुमारे महिन्याभरात लाखो व्हॉट्सॲप युजर्सचे अकाऊंट बॅन करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये नियमांचं उल्लंघण केल्याप्रकरणी 76 लाखांहून अधिसक व्हॉट्सॲप अकाऊंट बॅन करण्यात आले होते.
Tech Tips: WhatsApp वरील स्पॅम कॉल्समुळे हैराण झालात? लगेच अॅपमध्ये करा ही महत्त्वाची सेटिंग
प्रत्येक कंपनीचे काही नियम, जर कोणत्याही व्यक्तीने या नियमांचं उल्लंघण केलं तर संबंधित व्यक्तिवर कारवाई करण्यात येते. आता देखील व्हॉट्सॲप अशा युजर्सवर कारवाई करत आहेत, ज्यांनी कंपनीच्या नियमांचं उल्लंघण केलं आहे. अशाच युजर्सचं व्हॉट्सॲप अकाऊंट बॅन करण्यात येत आहे. व्हॉट्सॲप अकाऊंट कोणत्या गोष्टींमुळे बॅन होऊ शकतं, कंपनीचे काय नियम आहेत, याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
अनेक असे युजर्स आहेत, जे अधिकृत व्हॉट्सॲपचा वापर करण्याऐवजी थर्ड-पार्टी ॲपचा वापर करतात. थर्ड पार्टी ॲप्समध्ये WhatsApp Delta, GBWhatsApp आणि WhatsApp Plus यासांरख्या ॲप्सचा समावेश आहे. मेटाने नेहमीच त्यांच्या युजर्सना अधिकृत व्हॉट्सॲपचा वापर करण्यास सांगितलं आहे. मात्र अनेक युजर्स या थर्ड पार्टी व्हॉट्सॲपचा वापर करतात, पर्यायाने त्यांचे अकाऊंट्स काही काळात बॅन केले जातात.
जर तुम्ही कोणत्या इतर व्यक्तीचं नाव, फोटो आणि ओळख वापरून व्हॉट्सॲपचा वपर करत असाल तर तुमचं अकाऊंट बॅन होऊ शकतं. असं करणं व्हॉट्सॲपच्या कम्युनिटी गाइडलाइन्सचे उल्लंघण मानले जाते.
जर तुम्ही दिवसभर कॉन्टॅक्ट लिस्टशिवाय सतत इतरांना मॅसेज करत असाल तर हे स्पॅम मॅसेज मानले जातात. ज्यामुळे तुमचं व्हॉट्सॲप अकाऊंट बॅन केलं जाऊ शकतं.
कोणत्याही व्हॉट्सॲप युजरने तुमच्या अकाऊंटला रिपोर्ट केलं असेल तर तुमचं अकाऊंट बॅन होऊ शकतं. रिपोर्ट करण्यात आलेल्या अकाऊंटबाबत कंपनी कठोर कारवाई करू शकते. रिपोर्ट करणारा व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील आहे की इतर कोणी यामुळे कोणताही फरक पडत नाही.
WhatsApp सिक्योरिटीचा दावा खोटा? मार्क झुकरबर्गच्या या उत्तराने वाढलं करोडो यूजर्सचं टेंशन
तुम्ही एखाद्या व्यक्तिला त्रास देण्यासाठी किंवा धमकी देण्यासाठी व्हॉट्सॲप मॅसेज पाठवत असाल तर तुमच्यावर कारवाई केली जाईल आणि तुमचे अकाऊंट बंद केले जाईल. याशिवाय, प्रक्षोभक, द्वेषयुक्त किंवा आक्षेपार्ह संदेश पाठवल्याबद्दल देखील तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. यामुळे व्हॉट्सॲप वापरताना नेहमी काळजी घ्या. आपल्याकडून अशी कोणतीही चूक होऊ देऊ नका, ज्यामुळे तुमचं व्हॉट्सॲप अकाऊंट बॅन होईल. कंपनीच्या कम्युनिटी गाईडलाईन्सचं उल्लंघण होणार नाही, याची काळजी घ्या.