Tech Tips: Instagram वर ब्लू टिक मिळवणं आता अगदी सोपं! 6 स्टेप्समध्ये व्हेरिफाईड होईल तुमचं अकाऊंट
Instagram Blue Tick: तुमचं इंस्टाग्रामवर अकाऊंट आहे का? हल्ली प्रत्येक स्मार्टफोन युजरचं इंस्टाग्रामवर अकाऊंट असतं. इंस्टाग्राम केवळ रिल्स आणि व्हिडीओ पाहण्यासाठीच नाही तर पैसे कमवण्याचं देखील एक साधन आहे. इंस्टाग्राम त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन फीचर्स घेऊन येत असतो. ज्यामुळे अगदी सामान्य माणसांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण इंस्टाग्राम वापरतात.
ना कॉल करता येणार ना चॅट! तुमची एक चूक आणि कायमचं बंद होईल WhatsApp अकाऊंट
तुम्ही पाहिलं असेल की इंस्टाग्रामवर अनेक सेलिब्रिटींच्या अकाऊंटवर ब्लू टीक असते. आपल्या अकाऊंटपुढे देखील अशी ब्लू टीक असावं, असं अनेकांना वाटतं. पण इंस्टाग्रामवर ब्लू टीक मिळवायची कशी, हेच अनेकांना माहिती नसतं. पण आता आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही अगदी 6 स्टेप्समध्ये इंस्टाग्रामवर ब्लू टीक मिळवू शकता. इंस्टाग्रामवर ब्लू टिक मिळवण्यासाठी तुम्ही काही मिनिटांत अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. (फोटो सौजन्य – Pinterest)
इंस्टाग्रामवर ब्लू टिक कसे मिळवायचे? मला इंस्टाग्रामवर ब्लू टिक मोफत मिळू शकेल का? इंस्टाग्रामवर ब्लू टिकसाठी पैसे द्यावे लागतील की नाही? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येतात. पण या प्रश्नांची उत्तर न मिळाल्यामुळे अनेक युजर्स ब्लू टीकसाठी अर्जच करत नाहीत. पण आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्हाला इंस्टाग्रामवर ब्लू टिक कशी मिळवता येईल, अर्थात् ब्लू बॅजची पडताळणी करायची?
इंस्टाग्राम बहुतेक सर्वाना माहीत असलेल्या अकाऊंटलाच मोफत ब्लू टिक देते. जर तुम्ही एखाद्या सुप्रसिद्ध सेलिब्रिटी, राजकारणी किंवा इतर कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाशी निगडीत असाल तर, तर नक्कीच तुम्हाला इंस्टावर फ्री ब्लू टिक मिळेल. मात्र असे नसेल तर तुम्हाला पेड सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार आहे.