
Free Fire Max: आजचे रिवॉर्ड्स क्लेम करताच प्लेअर्सवर पडणार पैशांचा पाऊस! डायमंड आणि वेपन स्किन्ससह मिळणार बरंच काही...
प्लेअर्सना डायमंड्स, वेपन स्किन्स, आउटफिट्स, इमोट्स आणि अनेक प्रीमियम आइटम्स फ्रीमध्ये जिंकता यावेत, यासाठी गरेना रोज रिडीम कोड्सची यादी जाहिर करत असते. या यादीमध्ये दिलेले कोड्स मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असतात. जर तुम्ही निवडलेला कोड क्लेम होत नसेल तर समजा की तो कालबाह्य झाला आहे किंवा दुसऱ्या प्रदेशातील आहे.
फ्री फायर मॅक्स गेममध्ये प्लेअर्स डायमंड, वेपन्ससह ईमोट्सना देखील पंसती देतात. इमोट्स प्लेअर्सच्या भावना दाखवण्यासाठी गेममध्ये वापरल्या जातात. प्लेअर्स जेव्हा खूश असतात तेव्हा त्यांचा हा आनंद विक्ट्री इमोशन ईमोटद्वारे दाखवला जातो. हे इमोट इन-गेम सेक्शनमध्ये मिळतात. इमोट मिळवण्यासाठी प्लेअर्सना डायमंड खर्च करावे लागतात. याशिवाय रिडीम कोड्सद्वारे प्लेअर्सना ईमोट जिंकण्याची संधी देखील मिळते. आता आम्ही तुम्हाला अशाच काही ईमोट्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांना युजर्सनी पसंती दर्शवली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्री फायर मॅक्सच्या बेस्ट इमोट्सच्या लिस्टमध्ये पहिलं नाव Juggle आहे. हि ईमोट मिळवण्यासाठी 599 डायमंड खर्च करावे लागातात. गेममधील नवीन इमोट्सपैकी एक, हे इमोट कॅरेक्टर त्यांच्या हातात अनेक बॉल्स घेऊन खेळत असतात, जोपर्यंत एक बॉल त्याच्या डोक्यावर आदळत नाही, तोपर्यंत हा खेळ सुरु असतो. ही ईमोट तुम्ही तुमच्या मित्रांंसोबत गेम खेळताना वापरू शकता.
फ्री फायर मॅक्समध्ये ही ईमोट बऱ्याच काळापासून उपलब्ध आहे. ही ईमोट बाकी ईमोटपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. जेव्हा तुम्ही या ईमोटचा वापर करता तेव्हा गेममधील कॅरेक्टर तुम्हाला फुटबॉल खेळताना पाहायला मिळतो. या ईमोटची किंमत 599 डायमंड आहे.
या ईमोटच्या नावावरून समजलं आहे की, याचा वापर केल्यानंतर कॅरेक्टर भांगडा करणार आहे. हे ईमोट अत्यंत मजेदार आणि स्वस्त देखील आहे. याची किंमत केवळ 199 डायमंड आहे. गेम जिंकल्यानंतर किंवा शत्रूला संपवल्यानंतर याचा वापर केला जाऊ शकतो.
ही ईमोट प्लेअर्समध्ये अत्यंत लोकप्रिय मानली जाते. या ईमोट वापरल्याने कॅरेक्ट प्रॅक्टिसची अॅक्शन करेल. याची किंमत 599 डायमंड आहे.