
BSNL ची धमाकेदार ऑफर! व्हॅलिडीटी संपण्यासाठी केवळ 4 दिवस शिल्लक, 1 रुपयांत मिळणार डेली 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
गेल्या काही काळापासून सतत एक अपडेट समोर येत आहेत. ही अपडेट म्हणजे टेलिकॉम कंपन्या लवकरच रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे सर्वच टेलिकॉम कंपन्यांचे युजर्स चिंतेत आहेत. कंपन्यांनी जर हा निर्णय घेतला तर याचा परिणाम युजर्सवर होणार आहे, एवढं नक्की. एकीकडे रिचार्जच्या किंमती वाढवण्याची चर्चा सुरु असतानाच आता दुसरीकडे सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएल एक अशी ऑफर घेऊन आली आहे. ज्यामुळे सर्वचजण चकित झाले आहेत. कंपनी या ऑफरअंतर्गत संपूर्ण महिन्यासाठी फक्त 1 रुपयांत मोफत कॉलिंग, हाय-स्पीड डेटा आणि एसएमएस देत आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ही एक लिमिटेड टाइम ऑफर आहे आणि ही ऑफर 15 नोव्हेंबरपर्यंत व्हॅलिड असणार आहे. म्हणजेच युजर्स 15 नोव्हेंबरनंतर या ऑफरचा लाभ घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे, जर तुम्हाला कमी किमतीत महिनाभर मोफत कॉलिंग आणि हाय-स्पीड डेटाचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही ही बीएसएनएल ऑफर नक्कीच पाहू शकता. या ऑफरबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
खरं तर BSNL नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत नवीन आणि उत्तम ऑफर घेऊन येत असतो. आता देखील कंपनीने त्यांच्या युजर्सच्या संख्येत वाढ करण्यासाठी एक खास रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत केवळ 1 रुपये आहे. कंपनी त्यांच्या नवीन ग्राहकांना केवळ 1 रुपयांत 30 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करणार आहे. कंपनी या प्लॅनमध्ये दररोज 2GB हाय-स्पीड डेटासह सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग ऑफर करत आहे. एवढंच नाही तर या प्लॅनसह तुम्हाला रोज 100 एसएमएस देखील ऑफर केले जाणार आहे. याचा अर्थ असा आहे की, तुम्हाला संपूर्ण महिनाभर एकूण 60GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळणार आहे. तथापी, डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 40 kbps होणार आहे, मात्र तुमची बेसिक कनेक्टिविटी तशीच राहणार आहे.
मोबाईल गेमिंगची मजा होणार द्विगुणीत, खेळताना जाणवणार नाही थकवा… आजच खरेदी करा या अॅक्सेसरीज
ही ऑफर कंपनीच्या अॅक्टिव्ह युजर्ससाठी सुरु करण्यात आली नाही. कंपनीने ही ऑफर केवळ नवीन BSNL यूजर्ससाठी सादर केली आहे. जुने ग्राहक या ऑफरचा फायदा घेऊ शकत नाही. कंपनी नवीन कनेक्शनसह मोफत 4G सिम देखील देत आहे, त्यामुळे यूजर्सना अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. या 1 रुपयांच्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या जवळीवल BSNL रिटेलर किंवा कॉमन सर्विस सेंटरला भेट देऊ शकता. याशिवाय, तुम्ही बीएसएनएल वेबसाइट किंवा बीएसएनएल सेल्फ-केअर अॅपद्वारे देखील सक्रिय केले जाऊ शकते, परंतु लक्षात ठेवा की ही ऑफर फक्त 15 नोव्हेंबरपर्यंत वैध आहे.
Ans: ताबडतोब BSNL सेंटरला जाऊन डुप्लिकेट SIM मिळवा आणि हरवलेली SIM ब्लॉक करा जेणेकरून फसवणूक होऊ नये.
Ans: फोन रीस्टार्ट करा, नेटवर्क सेटिंग्ज अपडेट करा, किंवा BSNL ग्राहकसेवेशी संपर्क साधा.
Ans: BSNL Fiber (Bharat Fiber) साठी www.bsnl.co.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येतो.