
Tech Tips: तुम्हीही सतत तुमचा Laptop चार्जिंगला लावून ठेवताय? 90% यूजर्स करतात ही मोठी चूक, सत्य जाणून घ्या
बदलत्या तंत्रज्ञानाच्या या जगात स्मार्टफोनप्रमाणेच लॅपटॉप देखील आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. ऑफीस, शाळा, कॉलेज सर्वत्र लॅपटॉपची गरज असते. लॅपटॉपच्या मदतीने आपली काम अगदी सहज पूर्ण होतात. ऑनलाइन क्लासेज, ऑफिस वर्क किंवा एंटरटेनमेंट या सर्व कामांसाठी लॅपटॉपची गरज असते.
काही यूजर्स काम सुरु करण्याआधीच लॅपटॉप चार्ज करतात तर काही युजर्स दिवसभर लॅपटॉप चार्जिंगला लावून त्याचा वापर करतात. त्यामुळे अनेक युजर्सच्या मनात एकच प्रश्न असतो, तो म्हणजे लॅपटॉप चार्ज करण्याची योग्य पद्धत कोणती आणि सतत लॅपटॉप चार्जिंगला लावून ठेवणं योग्य आहे का? अनेकजण चुकीच्या पद्धतीने त्यांचा लॅपटॉप चार्ज करतात आणि यामुळे लॅपटॉपच्या बॅटरीवर परिणाम होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लॅपटॉपच्या चार्ज करण्याच्या योग्य पद्धतीबद्दल सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest)
जेव्हा तुम्ही लॅपटॉप सतत चार्जिंगला लावून ठेवता तेव्हा बॅटरी 100 टक्के चार्ज झाल्यानंतर देखील सतत वीज वाया जाते. यामुळे बॅटरी देखील गरम होते आणि लिथियम-आयन सेल्सवर दवाब येतो. सतत असं झाल्यामुळे बॅटरीच्या चार्जिंग क्षमतेवर परिणाम होतो आणि बॅटरीची चार्जिंग क्षमता कमी होते. ज्यामुळे बॅकअप टाईम कमी होतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, लॅपटॉपची बॅटरी 20% ते 80% दरम्यान ठेवणे योग्य असते. यामुळे जर तुम्ही सतत तुमच्या लॅपटॉपला 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करत असाल तर तुमच्या लॅपटॉपची बॅटरी लवकर खराब होऊ शकते.
तुम्ही जर सतत तुमचा लॅपटॉप प्लग इन ठेवला, तर लॅपटॉपच्या आतील तापमान सतत वाढते. विशेषत: जेव्हा हेवी सॉफ्टवेयरचा वापर करत असाल किंवा गेमिंग करत असाल तर अशावेळी चार्जर लावून ठेवल्यास तुमचे डिव्हाईस ओव्हरहिट होते. ओव्हरहिटमुळे केवळ बॅटरीच नाही तर मदरबोर्ड आणि प्रोसेसरचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
जर तुम्ही दिर्घकाळापर्यंत लॅपटॉपवर काम करत असाल तर बॅटरी 80 टक्के चार्ज झाल्यानंतर चार्जर काढून टाका. जेव्हा बॅटरी 20 टक्के किंवा त्याहून कमी होते तेव्हा चार्जर पुन्हा कनेक्ट करा. सध्याच्या लॅपटॉपमध्ये बॅटरी हेल्थ मोड किंवा स्मार्ट चार्जिंग सारखे फीचर्स दिलेले असतात, ज्यामुळे तुम्ही चार्जिंग नियंत्रित करू शकता. हे फीचर अॅक्टिव्ह करून तुम्ही बॅटरीचे आयुष्य वाढवू शकता. तुमचा लॅपटॉप सतत चार्जवर ठेवणे सोयीचे वाटू शकते पण ते हळूहळू तुमच्या डिव्हाइसच्या बॅटरी लाईफसाठी विषारी ठरू शकते. जर तुम्हाला तुमचा लॅपटॉप वर्षानुवर्षे सुरळीत आणि विश्वासार्हपणे चालायचा असेल, तर वेळोवेळी बॅटरी डिस्कनेक्ट करा आणि त्याला थोडा आराम द्या.