सर्वांसाठी लाईव्ह झाले Jio चे फ्री Google AI Pro सब्सक्रिप्शन, क्लेम करण्यासाठी आत्ताच फॉलो या स्टेप्स
Reliance Jio ने आजपासून म्हणजेच 8 नोव्हेंबरपासून 18 महिन्यांसाठी फ्री Google AI Pro सब्सक्रिप्शन देण्यासाठी सुरुवात केली आहे. भारतीय टेलीकॉम कंपनीने गेल्या आठवड्यात Google सह पार्टनरशिप केल्याची घोषणा केली होती. या पार्टनरशिपअंतर्गत यूजर्सना Gemini AI चा फ्री एक्सेस दिला जाणार आहे. याची व्हलिडीटी दिड वर्षांची म्हणजेच 18 महिन्यांची असणार आहे. सुरुवातीला कंपनीने सांगितलं होतं की, ही ऑफर केवळ 18 ते 25 वर्ष वय असलेल्या युजर्ससाठी उपलब्ध असणार आहे, मात्र आता कंपनी ही ऑफर 25 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या युजर्ससाठी देखील सुरु करत आहे.
18 महिन्यांचे फ्री Gemini Pro फीचर्स एक्सेस करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जिओ सिमकार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे. यानंतर या सिमकार्डमध्ये अनलिमिटेड 5G प्लॅन चालू असला पाहिजे. ही या ऑफरससाठी सर्वात बेसिक अट आहे. एकदा तुम्ही हे निश्चित केले की, MyJio अॅपमध्ये खालील स्टेप्स फॉलो करा. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्री टियरच्या तुलनेत, Google AI Pro (किंवा Gemini Pro) सब्सक्रिप्शनमध्ये युजर्सना नवीन आणि अनेक पावरफुल फीचर्स वापरण्याची संधी मिळणार आहे. सहसा हा प्लॅन 1,950 रुपये प्रति महिना असा उपलब्ध आहे. मात्र Jio यूजर्स हा प्लॅन 18 महिन्यांसाठी फ्रीमध्ये वापरू शकणार आहे. म्हणजेच युजर्सना Google AI Pro (किंवा Gemini Pro) सब्सक्रिप्शन वापरण्याची संधी देखील मिळणार आहे आणि युजर्सची बचत देखील होणार आहे.
यामध्ये तुम्हाला Gemini 2.5 Pro AI मॉडेलचा एक्सटेंडेड अॅक्सेस मिळणार आहे. यासोबतच Nano Banana आणि Deep Research सारखे अॅडवांस्ड फीचर्सचा वापर करण्याची देखील संधी मिळणार आहे. Gemini 2.5 Pro वर Deep Research फीचर फ्री यूजर्ससाठी उपलब्ध नाही.
सर्वात मजेदार फीचर म्हणजे Veo 3.1 Fast. या फीचरच्या मदतीने तुम्ही फक्त टेक्स्ट प्रॉम्प्ट टाकून AI व्हिडिओ तयार करू शकता. या व्हिडिओंमध्ये ऑडिओ देखील आपोआप जोडला जातो, ज्यामुळे तुम्हाला क्रिएटिव आर्ट प्रोजेक्ट्स किंवा मजेदार व्हिडिओ तयार करता येतात. याशिवाय, या टियरमध्ये तुम्हाला जेमिनी कमांड लाइन इंटरफेस (CLI) आणि जेमिनी कोड असिस्ट IDE एक्सटेंशनचा एक्सेस देखील मिळणार आहे, ज्यामध्ये हाई रेट लिमिट्स देण्यात आली आहे.
यूजर्स Google Workspace अॅप्स जसे Gmail, Drive, Docs, Sheets इत्यादीमध्ये देखील AI फीचर्सचा वापर करू शकणार आहेत. यासोबतच, या सब्सक्रिप्शनमध्ये Whisk अॅप आणि Flow आणि NotebookLM प्लॅटफॉर्म्ससाठी देखील हाय लिमिट्स समाविष्ट आहेत. शेवटी, सबस्क्रिप्शन वापरकर्त्यांना 2TB क्लाउड स्टोरेज देते, जे ड्राइव्ह, जीमेल आणि फोटोमध्ये शेअर केले जाते.






