
सरकारी टेलिकॉम कंपनीचा मोठा निर्णय! ‘ही’ सर्व्हिस लवकरच बंद होण्याची शक्यता, लाखो ग्राहकांवर होणार परिणाम
कंपनी बऱ्याच काळापासून 4जी सर्विस अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कंपनीचे बरेच यूजर्स सध्या 4G नेटवर्क सेटअपचा वापर करत आहेत. याशिवाय 4G नेटवर्क सेटअपचा विस्तार देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सर्व गोष्टींची विचार करता आता कंपनीने 3G सर्विस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आजही, बीएसएनएलची 3G सर्विस देशातील हजारो शहरांमध्ये सुरू आहे, जी कोट्यवधी लोक वापरत आहेत. त्यामुळे कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम कोट्यावधी यूजर्सवर होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
BSNL ने घेतलेल्या या निर्णयाचा थेट परिणाम करोडो यूजर्सवर होणार आहे. TRAI च्या आकड्यांनुसार, आता देखील BSNL चे अनेक यूजर्स 2G आणि 3G सिमचा वापर करत आहेत. जर तुम्ही देखील या यूजर्समध्ये सहभागी असाल आणि अजूनही 3G सिमचा वापर करत असाल तर आता तुम्हाला तुमचे सिम अपग्रेड करावे लागणार आहे. कारण कंपनी त्यांची ही सर्विस लवकरच बंद करणार आहे. याचा अर्थ असा आहे की, 3G सिमचा वापर करत असलेल्या सर्व यूजर्सना आता त्यांचे सिम 4G नेटवर्कमध्ये अपग्रेड करावे लागणार आहे. याशिवाय जर तुमचा फोन 4G किंवा 5G सपोर्टेड नसेल तर तुम्हाला नवीन फोन खरेदी करावा लागणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिन्यात, BSNL ने सर्व मंडळांच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहून म्हटले आहे की ते 4G नेटवर्कच्या कव्हरेजकडे पाहून 3G सेवा बंद करू शकतात. त्यामुळे आता 3G सेवा वापरणाऱ्या सर्व यूजर्सना लवकरात लवकर त्यांचे सिम अपग्रेड करावे लागणार आहे. याशिवाय जर फोन 4G किंवा 5G सपोर्टेड नसेल तर फोन देखील बदलावा लागणार आहे.
BSNL ने यावर्षीच्या अखेरपर्यंत देशभरात एक लाख 4G टॉवर लावण्याचे ध्येय ठेवले होते. ज्यामधील सुमारे 97,00 टॉवर लावण्यात आले आहेत. सरकारी कंपनीने स्वदेशी टेक्नोलॉजीचा वापरस करून हे संपूर्ण नेटवर्क तयार केले आहेत. या नेटवर्कची सर्वात खास गोष्ट म्हणजेच हि सेवा 5G रेडी आहे. 4G रोलआउट पूर्ण होताच कंपनी 5G कनेक्टिव्हिटीवर काम सुरू करेल. असे मानले जाते की बीएसएनएलची 5G सेवा देखील पुढील वर्षी सुरू होईल.
Ans: BSNL कडून दिली जाणारी तिसऱ्या पिढीची मोबाईल इंटरनेट व कॉल सेवा.
Ans: होय, BSNL हळूहळू 3G सेवा बंद करून 4G/5G कडे वळत आहे.
Ans: इंटरनेट स्पीड कमी होऊ शकतो किंवा सेवा पूर्णपणे बंद होऊ शकते.