Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वे पोहचणार चंद्रावर! NASA ची तयारी सुरु, लुनार रेल्वेचा उपयोग कसा होणार जाणून घ्या

आता पृथ्वीची कक्षा मोडून रेल्वे पोहचणार थेट चंद्रावर! NASA च्या नव्या उपक्रमाला सुरुवात

  • By नुपूर भगत
Updated On: May 17, 2024 | 01:33 PM
रेल्वे पोहचणार चंद्रावर! NASA ची तयारी सुरु, लुनार रेल्वेचा उपयोग कसा होणार जाणून घ्या
Follow Us
Close
Follow Us:

रेल्वे, लोकल ट्रेन हे भारतीयांच्या जीवनातले जिव्हाळ्याचे विषय. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात अनेक ठिकाणी रेल्वेचे विस्तृत जाळे पसरलेले आहेत. आणि आता थेट पृथ्वीची कक्षा मोडून ही रेल्वे चंद्रापर्यंत पोहचणार आहे. अमेरिकन स्पेस एजन्सी नासा चंद्रावर कार्यक्षम पेलोड वाहतुकीसाठी पहिली लुनार रेल्वे प्रणाली विकसित करण्याची योजना आखत आहे. NASA ने एक ऑफिशिअल ब्लॉग पोस्ट शेअर करत या रोबोटिक वाहतूक प्रणालीची माहिती दिली आहे. २०३० पर्यंत ही प्रणाली विकसित करण्यात येणार असल्याचा अंदाज नासाने वर्तवला आहे. नासाच्या आगामी चंद्र ते मंगळ मोहिमांमध्ये आणि रोबोटिक लुनार सरफेस ऑपरेशन्स २ (RLSO2) सारख्या मिशनसाठी ही लुनार रेल्वे प्रणाली महत्त्वाची असणार आहे.

चंद्राच्या तळाभोवती, लँडिंग झोन किंवा इतर मुख्य केंद्रबिंदूंवरून आवश्यक ते सामान मूळ मोहिमेच्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी एक वाहतूक व्यवस्था गरजेची होती ज्यासाठी आता नासाने FLOAT म्हणजेच (Flexible Levitation on a Track) ही प्रणाली सादर केली आहे. नेमकं या माध्यमातून कोणत्या प्रश्नांवर नासा उत्तर शोधू शकणार आहे व त्याचा फायदा काय हे जाणून घेऊया..नेमकं या माध्यमातून नासा नक्की काय शोधू पाहणार आहे आणि त्यांचा काय फायदा होणार आहे हे जाणून घेऊयात.

[read_also content=”Samsung Galaxy F14 5G१० हजारांपेक्षाही कमी किमतीत मिळत आहे सॅमसंग’चा 5G फोन, जाणून घ्या दमदार फीचर्स https://www.navarashtra.com/technology/samsungs-5g-phone-is-available-for-less-than-10-thousand-know-the-powerful-features-533214.html”]

FLOAT प्रणाली जाणून घेऊ…

FLOAT सिस्टीम अनपॉवरेड मॅग्नेटिक रोबोट्सचा वापर करून तीन लेअर्सची लवचिक फिल्म ट्रॅकवर उत्सर्जित करेल, या ग्रेफाइट लेअर मॉडेल्सना डायमनेटिक लेव्हिटेशनच्या ट्रॅकवर फ्लोट होण्यास मदत होईल. फ्लेक्स-सर्किट लेयर रोबोट्स ट्रॅकच्या बाजूने नियंत्रितपणे चालण्यासाठी इलेक्ट्रोमॅगटिक थ्रस्ट निर्माण करेल आणि एक पर्यायी मध्यम-फिल्म सोलर पॅनेल लेअर बेससाठी सूर्यप्रकाशात उर्जा निर्माण करेल.फ्लोट रोबोट्समध्ये हालचालींसाठी चाके नसतील ज्यामुळे रेल्वेलाची ट्रॅकवर पुढे मागे जाताना चंद्राच्या पृष्ठभागावर घासले जाऊन झीज होण्याची शक्यता कमी असते.

म्हणजेच, नासा या फ्लोट सिस्टीमच्या मदतीने व चंद्राच्या पृष्ठभागावर एक घसरती लेअर तयार करणार आहे ज्यामुळे रोबोट्सना त्यावरून एखाद्या घसरगुंडीप्रमाणे घसरून पुढे जाता येईल. यासाठी सौरऊर्जेचा वापर पर्याय म्हणून करण्यात येणार आहे. ही प्रणाली आवश्यक बांधकाम साहित्य, मोहिमांसाठी वस्तूंची ने-आण करण्यासाठीचे काम करणार आहे.

नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीचे चे रोबोटिक्स तज्ज्ञ एथन स्केलर यांनी या प्रणालीविषयीची माहिती देताना सांगितले की, “आम्हाला पहिली लुनार रेल्वे प्रणाली तयार करायची आहे, जी चंद्रावर विश्वासार्ह, स्वायत्त आणि कार्यक्षम पेलोड वाहतूक प्रदान करेल.

नासाच्या योजनेपप्रमाणे , FLOAT फक्त मशीनसाठी असेल. चंद्राच्या पृष्ठभागावरील धुळीपासून रोबोट्सची होणारी झीज कमी करण्यासाठी तीन-लेयर मूव्ही ट्रॅकवर फिरणारे चुंबकीय रोबोट तयार केले जातील. या रोबोट्सवर गाड्या बसवल्या जातील ज्या ताशी १.६१ किलोमीटर वेगाने फिरतील. यातुन नासाच्या तळावर दररोज १०० टन सामग्रीची ने-आण सहजरित्या शक्य होईल.

Web Title: The train will go to the moon nasas preparation begins know how the lunar railway will be used

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2024 | 11:23 AM

Topics:  

  • NASA

संबंधित बातम्या

पृथ्वीची श्वास रोखू शकते सूर्याची वाढती उष्णता; नासाच्या अभ्यासानुसार जवळ आली ‘ऑक्सिजनच्या शेवटाची तारीख’?
1

पृथ्वीची श्वास रोखू शकते सूर्याची वाढती उष्णता; नासाच्या अभ्यासानुसार जवळ आली ‘ऑक्सिजनच्या शेवटाची तारीख’?

पृथ्वीकडे येणारा ‘हा’ धूमकेतू आहे एक एलियन शिप; शास्त्रज्ञ ‘Avi Loeb’ यांचा खळबळजनक दावा
2

पृथ्वीकडे येणारा ‘हा’ धूमकेतू आहे एक एलियन शिप; शास्त्रज्ञ ‘Avi Loeb’ यांचा खळबळजनक दावा

‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’चे होणार महासागरात विसर्जन? NASA च्या धक्कादायक निर्णयाचे कारण तरी काय?
3

‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’चे होणार महासागरात विसर्जन? NASA च्या धक्कादायक निर्णयाचे कारण तरी काय?

NASA-ISRO ची पुन्हा एकदा अवकाशात झेप, पृथ्वीचा प्रत्येक क्षण टिपणार NISAR Satellite
4

NASA-ISRO ची पुन्हा एकदा अवकाशात झेप, पृथ्वीचा प्रत्येक क्षण टिपणार NISAR Satellite

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.