Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NASA-ISRO ची पुन्हा एकदा अवकाशात झेप, पृथ्वीचा प्रत्येक क्षण टिपणार NISAR Satellite

नासा आणि इस्रोचा महत्वाकांक्षी उपक्रम 'निसार मिशन' ची सुरुवात झाली आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून GSLV-F16 वर नासा-इस्रो निसार उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 30, 2025 | 09:07 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Close
Follow Us:

अंतराळ हे नेहमीच वैज्ञानिकांसाठी अभ्यासाचा केंद्रबिंदू राहिले आहे. त्यामुळे देशातील वैज्ञानिकांच्या पुढाकाराने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले जातात. गेल्या काही वर्षांत Indian Space Research Organisation म्हणजेच इस्रोने, विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे, NASA ने देखील अत्याधुनिक उपग्रहांच्या सहाय्याने आणि त्यातून करण्यात आलेल्या अभ्यासाच्या माध्यमातून अंतराळातील अनेक महत्त्वाचे तथ्य जगासमोर मांडले आहेत. आता, या दोन्ही बलाढ्य अंतराळ संशोधन संस्थेने एकत्रित येत ‘निसार मिशन’ ची सुरुवात केली आहे.

Operation Sindoor: “मी बोलतोय ना, पंतप्रधान आले तर…”; गोंधळ घालणाऱ्या विरोधकांविरुद्ध अमित शहा कडाडले

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र (SDSC) येथून GSLV-F16 वर NASA-ISRO NISAR उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. हा ISRO आणि NASA चा संयुक्त प्रकल्प आहे.

याचा उपयोग काय?

हा उपग्रह भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींची आधीच सूचना देईल. हे उपग्रह भारताच्या इस्रो आणि अमेरिकेच्या नासा यांनी संयुक्तपणे तयार केले आहे. हा जगातील पहिला उपग्रह आहे जो दोन रडार फ्रिक्वेन्सी (एल-बँड आणि एस-बँड) वापरून पृथ्वीला स्कॅन करेल. त्यामुळेच या उपग्रहाला पृथ्वीचा MRI Scanner देखील बोलले जात आहे.

हे NISAR मिशन नेमकं आहे तरी काय?

NISAR हा NASA आणि ISRO ने बनवलेला लो अर्थ ऑर्बिट (LEO) उपग्रह आहे. त्याचे पूर्ण नाव NASA-ISRO सिंथेटिक एपर्चर रडार आहे. ते पृथ्वीचा पृष्ठभाग, बर्फ आणि जंगलांचे स्कॅन करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. त्याला “पृथ्वीचा MRI स्कॅनर” देखील म्हंटले जात आहे कारण हा पृथ्वीच्या पृष्ठभागाचे खूप बारीक फोटो काढू शकतो, जसे डॉक्टर MRI स्कॅनद्वारे शरीरातील बारीक बारीक गोष्टी पाहतो.

कुंकूच राहिलं नाही आणि ऑपरेशन मात्र ‘सिंदूर’, कोण आहेत हे लेखक; जया बच्चन राज्यसभेत भडकल्या

हा उपग्रह दर १२ दिवसांनी संपूर्ण पृथ्वीचे स्कॅन करेल आणि भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी आणि भूस्खलन यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा इशारा देण्यास मदत करेल. या मिशनसाठी 13000 कोटी रुपयांचा (1.5 अब्ज डॉलर्स) खर्च आला आहे, ज्यामध्ये इस्रोचे योगदान 788 कोटी रुपये आहे. त्याचा डेटा जगभरातील शास्त्रज्ञ, सरकार आणि सामान्य लोकांना मोफत उपलब्ध असेल.

Web Title: Nasa isro successfully launch nisar satellite know the full detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 09:07 PM

Topics:  

  • ISRO
  • NASA
  • space mission

संबंधित बातम्या

Universe Mystery: अनंत आहे अंतराळ! सूर्यमालेत सापडला नववा रहस्यमय ग्रह; अज्ञात विश्वाच्या अस्तित्वाचे संकेत
1

Universe Mystery: अनंत आहे अंतराळ! सूर्यमालेत सापडला नववा रहस्यमय ग्रह; अज्ञात विश्वाच्या अस्तित्वाचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.