फोटो सौजन्य - pinterest
आपण कोठेही फिरायला गेलो, घरी काही कार्यक्रम असला, लग्नासाठी गेलो, किंवा एखादा खास क्षण असेल, प्रत्येक क्षणाचे फोटो आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करायला आवडतात. खास क्षणांच्या आठवणींचे फोटो काढून आपण त्या आपल्या मोबईलमध्ये जपून ठेवतो. आपल्या फोनमध्ये हजारो फोटो असतात. आगदी लहाणपणापासून मोठं हाईपर्यंत अशा अनेक आठवणी आपण आपल्या फोनमध्ये साठवून ठेवतो. लग्नाचे व्हिडीओ तयार केले जातात. एखादा विशेष कार्यक्रम असेल तर अशावेळी फोटोग्राफरला बोलावलं जात. एकूणच काय आपण हल्ली आपण आपल्या सर्व आठवणी फोटोमध्ये कॅप्चर करतो, जेणेकरून भविष्यात आपण हे फोटो पाहिले तर आपल्या जुन्या आठवणी ताज्या होतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का जगातील पहिला फोटो कोणी, कसा आणि कधी काढला असेल?
हेदेखील वाचा- ऑनलाईन स्कॅमचा धोका टाळण्यासाठी Apple कडून युजर्ससाठी काही टीप्स जारी
आपल्याला अनेकववेळा असा प्रश्न पडतो की जगातील पहिला फोटो कोणी काढला असेल, त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचा कॅमेरा असेल, तो कॅमेरा कसा असेल, अशा तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तर आज मिळतील. हसन इब्न अल-हैथम यांनी 1021 मध्ये कॅमेरा ऑब्स्क्युराचा शोध लावला. हा फोटोग्राफिक कॅमेराचा सर्वात जुना प्रकार आहे. हसन इब्न अल-हैथम हे सध्याच्या इराकमधील इस्लामिक सुवर्णयुगातील मध्ययुगीन गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होते. आधुनिक ऑप्टिक्सचे जनक म्हणून त्यांना संबोधले जाते.
1021 मध्ये अल-हैथम यांनी कॅमेऱ्याचा शोध लावला खरा पण या कॅमेऱ्याचा वापर करून पहिला फोटो काढण्यासाठी अनेक वर्षांचा काळ जावा लागला. फ्रेंच शास्त्रज्ञ जोसेफ निसेफोर यांनी 1826 मध्ये, फोटोग्राफिक प्लेट आणि कॅमेरा ऑब्स्क्युरा वापरून पहिला फोटो काढला. फ्रेंच शास्त्रज्ञ जोसेफ निसेफोर यांनी खिडकीतून काढलेला हा फोटो पूर्णपणे स्पष्ट नव्हता. आजपासून सुमारे 200 वर्षांपूर्वी पहिला फोटो काढण्यात आला होता. हा फोटो प्रत्यक्षात आणण्याचे श्रेय जोसेफ निसेफोर आणि लुई डॉगर या शास्त्रज्ञांना दिले जाते.
हेदेखील वाचा- Apple HomePod ने वाचवले लोकांचे प्राण! आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाला पाठवला इमर्जन्सी अलर्ट
1826 मध्ये फोटोग्राफिक प्लेट आणि कॅमेरा ऑब्स्क्युरा वापरून शास्त्रज्ञ जोसेफ यांनी पहिला फोटो काढला. पण ऑब्स्क्युरा कॅमेर्याने छायाचित्र टिपण्यासाठी सुमारे 8 तासांचा कालावधी लागल्याचं सांगितलं जातं. आज आपण काही सेकंदातच कितीतरी फोटो काढू शकतो. पण पहिला फोटो काढण्यासाठी 8 तासांचा कालावधी लागला होता. हा पहिला फोटो ब्लॅक अँड व्हाईट होता. यानंतर स्कॉटिश भौतिकशास्त्रज्ञ क्लर्क मॅक्सवेल यांनी1861 मध्ये जगातील पहिला रंगीत फोटो काढला. हा फोटो एका रिबनचा होता, ज्यात लाल, निळे आणि पिवळे रंग होते. म्हणजेच पहिला ब्लॅक अँड व्हाईट फोटो टिपल्यानंतर सुमारे 34 वर्षांनी पहिला रंगीत फोटो काढण्यात आला. 1832 मध्ये, शास्त्रज्ञांनी लैव्हेंडर तेलचा वापर करून फोटो काढण्यास सुरुवात केली. ज्यामुळे फोटो एका दिवसाच कॅप्चर हाऊ लागले.