इंस्टाग्रामवरील अॅडमधून शॉपिंग करताय? लिंकवर क्लिक करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा (फोटो सौजन्य- pinterest)
सोशल मिडीया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर केवळ फोटो, व्हिडीओ आणि रिल्सच शेअर केल्या जात नाहीत, तर इथे बिझनेस देखील केला जातो. ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मच्या यादीमध्ये ई कॉमर्स प्लॅटफॉर्म प्लिपकार्ट, अॅमेझान, याप्रमाणे आता इंस्टाग्रामचं नाव देखील जोडलं जात आहे. आपण इंस्टाग्रामवर पोस्ट पाहत असताना किंवा रिल्स स्क्रोल करत असताना आपल्याला अनेक प्रोडक्ट्सच्या जाहिराती पाहायला मिळतात. जाहिराती अतिशय आकर्षक असतात, ज्यामुळे युजर्स त्वरीत आकर्षित होऊ शकतील. पण या आकर्षणासोबतच फसणूकीचं प्रमाण देखील तितकंच असतं.
हेदेखील वाचा- भारतात सुरू झाली Instagram Creator Lab! क्रिएटर्सना मिळणार फेमस होण्यासाठी खास मंत्र
रिल्स स्क्रोल करत असताना अचानक एक उत्पादन दिसते. यानंतर बोटे थांबतात आणि नंतर खालच्या कोपऱ्यात Buy Now बटण दिसते. यासोबतच खरेदी करण्यासाठी कमेंट बॉक्स आणि बायोमध्ये लिंक देण्यात आलेली असते. आपण मान्य करूया की इंस्टाग्राम हे खरेदीचे नवीन केंद्र बनले आहे. इथे खरेदीच्या नावाखाली अनेक फसवणूक देखील होत आहे. अशा परिस्थितीत काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही एखाद्या चुकीच्या लिंकवर केल्यास तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत.
Buy Now या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही संबंधित कंपनीच्या वेब पोर्टलवर किंवा ॲपवर पोहोचता. वेबसाईट किंवा ॲपवर पोहोचल्यानंतर प्रथम COD म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय आहे की नाही ते तपासा. तिथे कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय नसल्यास, बॅक करा. शक्य तितक्या लवकर अशा पोर्टल ब्लॉक करा.
जर पोर्टल COD सेवा देत नसेल तर फसवणूकीची शक्यता अधिक असते. अनेक ई-कॉमर्स पोर्टल देखील हे करतात, परंतु केवळ काही उत्पादनांसाठी आणि निवडलेल्या पिन कोडवरच. तुम्हाला इंस्टाग्रामवरील एखाद्या अनोळखी वेबसाईटवरून खरेदी करायची असल्यास ऑर्डर फक्त COD वर घ्या, ज्यामध्ये ऑर्डर घरी पोहोचल्यावर पेमेंट केले जाईल. आजकाल प्रत्येक पोर्टल पेमेंटसाठी कार्ड मशीनला QR कोड प्रदान करते.
हेदेखील वाचा- Instagram युजर्ससाठी लाँच झालं नवीन अपडेट! आता एकाच वेळी 20 फोटो-व्हिडिओ शेअर करू शकणार
प्रत्येक उत्पादनाची एक ठरावीक किंमत असते. अशा परिस्थितीत, जर एखादे उत्पादन त्याच्या मूळ किमतीपेक्षा खूपच कमी किमतीत उपलब्ध असेल तर तिथे धोका असू शकतो. अलीकडेच मूळ किंमतीपेक्षा 8,000 रुपये कमी किंमत असलेला स्मार्टफोन व्हायरल झाला होता. चौकशी केली असता हा स्मार्टफोन भारताबाहेरचा असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित कंपनी आंतरराष्ट्रीय वॉरंटीही देत नाही. याचा अर्थ, जर तुम्ही फोन विकत घेतला असेल तर तुमची फसवणूक होणार हे निश्चित होते.
इन्स्टा अकाऊंटवरील कमेंट्स बंद असतील तर याचा अर्थ स्कॅम. कमेंट हे एक वैशिष्ट्य आहे जे प्रत्येक पोस्टचे रहस्य प्रकट करते. उत्पादन चांगले की वाईट? हे फक्त कमेंटमधून कळेल. म्हणून, जर खात्याने हे वैशिष्ट्य बंद केले असेल, तर स्पष्टपणे ब्रँड स्वतःबद्दल सत्य सांगू इच्छित नाही. अशा पोर्टल्सपासून दूर राहा.
तुम्हाला एखादे उत्पादन ऑर्डर करायचे असेल तर फक्त पत्ता आणि मोबाईल नंबर पुरेसा आहे. जर कोणत्याही पोर्टलने आधार कार्ड किंवा पॅन कार्ड या व्यतिरिक्त काहीही विचारले तर तुम्हाला फक्त यू-टर्न घ्यावा लागेल.