
Google Gemini 3 मध्ये अनेक नवीन फिचर्सचा समावेश! सर्चमध्ये दिसणार इंटरॅक्टिव रिझल्ट, जाणून घ्या सविस्तर
हे मॉडेल यूजर्सना खूश करण्याऐवजी अचूक, स्पष्ट आणि उपयुक्त उत्तर देण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करतो. गूगलने सांगितलं आहे की, यूजरच्या अपेक्षांची पुर्नरचना करण्याऐवजी हे मॉडेल स्मार्ट आणि डायरेक्ट रिस्पॉन्स देतो. ज्यामुळे यूजर्सना रियल इनसाइट मिळतात. हे मॉडेल कॉन्टेक्स्ट समजून घेऊन टास्कच्या टोनमध्ये रिस्पॉन्स देते. (फोटो सौजन्य – X)
Introducing Nano Banana Pro (Gemini 3 Pro Image), our new state-of-the-art image generation and editing model from @GoogleDeepMind. It improves on the original model while adding new advanced capabilities, enhanced world knowledge and text rendering, allowing you to create and… pic.twitter.com/ArCsRVsFIW — Google (@Google) November 20, 2025
जेमिनी 3 मल्टीमॉडेलिटी सपोर्टसह रोलआऊट करण्यात आलं आहे. ही सिस्टम एकाच वर्कफ्लोमध्ये ईमेज, व्हिडीओ आणि कोड हँडल करते. जर यूजर एका प्रॉम्प्टमध्ये हातांनी लिहीलेल्या नोट्स, स्क्रीनशॉट, मोठे व्हिडीओ आणि रिसर्च पेपर इत्यादी अपलोड करत असतील, तर हे मॉडेल हा सर्व कंटेट एकसाथ समजणार आहे. याची कॉन्टेक्स्ट विंडो 10 लाख टोकनची आहे. ज्यामुळे हे मोठे डॉक्यूमेंट आणि कन्वर्सेशनला रीड आणि रिटेन करू शकणार आहे.
Gemini 3 हे नवीन मॉडेल सुमारे सर्व AI बेंचमार्कवर यशस्वी झाले आहे. LMArena वर हे 1501 च्या Elo स्कोरसह 1 नंबरवर आहे. एकेडमिक रीजनिंग आणि रियल-वर्ल्ड सोल्विंगच्या चाचणीमध्ये देखील त्याने दमदार कामगिरी केली आहे. डेलवपर्ससाठी देखील हे नवीन मॉडेल WebDev Arena मध्ये 1487 स्कोरसह सर्वात पुढे आहे.
BSNL Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनीची अनोखी खेळी! घेतला असा निर्णय… सोशल मीडियावर भडकले यूजर्स
गूगलने Gemini 3 हे नवीन मॉडेल सर्चच्या AI मोडमध्ये इंटीग्रेट केले आहे आणि हे सर्चमध्ये डायनामिक विजुअल लेआउट, इंटरॅक्टिव टूल्स आणि सिम्युलेशन दाखवते. जेव्हा एखादा यूजर त्याला गुंतागुंतीचे प्रश्न विचारतो तेव्हा तो टेबल, चार्ट आणि अगदी कस्टम कॅल्क्युलेटरसह प्रतिसाद देतो. हे ऑर्बिटल फिजिक्स इत्यादींवरील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी इंटरेक्टिव मॉड्यूल देखील देते, जे यूजरला विषय अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत करते.
Ans: Google Gemini हे Google चे पुढील पिढीचे AI मॉडेल आहे, जे टेक्स्ट, फोटो, व्हिडिओ, ऑडिओ आणि कोड समजण्याची क्षमता ठेवते.
Ans: Bard हा चॅटबॉट होता, तर Gemini हे संपूर्ण मल्टीमोडल AI मॉडेल आहे. Bard चे नाव बदलून आता Gemini करण्यात आले आहे.
Ans: Gemini चे SGE (Search Generative Experience) फीचर वापरून सर्चमध्ये इंटरॅक्टिव, व्हिज्युअल आणि डायनॅमिक उत्तरं दिली जातात.