Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमच्या स्मार्टफोनमध्येच काढा DSLR सारखा भारी फोटो, फॉलो करा काही सोप्या स्टेप्स

DSLR सारखे फोटो काढू शकत नाही, असं काहींना वाटतं. पण आपल्या फोनमध्ये DSLR सारखे फोटो काढणं अगदी सोपं आहे, यासाठी आपल्याला महागड्या कॅमेऱ्याची गरज नसून काही टीप्सची गरज आहे. सोप्या टीप्सच्या मदतीने तुम्ही DSLR सारखे भारी फोटो तुमच्या स्मार्टफोनमध्येच काढू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 08, 2024 | 10:38 AM
तुमच्या स्मार्टफोनमध्येच काढा DSLR सारखा भारी फोटो (फोटो सौजन्य- pinterest)

तुमच्या स्मार्टफोनमध्येच काढा DSLR सारखा भारी फोटो (फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

हल्ली लोकं DSLR पेक्षा स्मार्टफोनने फोटो काढणं जास्त पसंत करतात. कारण आपण DSLR कॅमेरा सर्वत्र घेऊन फिरू शकत नाही, पण आपला स्मार्टफोन सतत आपल्यासोबत असतो. आणि स्मार्टफोनने फोटो काढणं देखील अगदी सोपं आहे. आपण DSLR पेक्षा आपल्या स्मार्टफोनने लवकर फोटो काढू शकता. हल्ली अनेक टेक कंपन्या त्यांच्या मोबाईलमध्ये DSLR सारखा कॅमेरा देत आहेत, ज्यामुळे युजर्सना फोटो काढणं अगदी सोपं होऊ शकेल. कारण लोकं फोन खरेदी करताना सर्वात आधी त्या फोनचा कॅमेरा तपासतात, जर फोनची कॅमेरा क्वालिटीच चांगली नसेल, तर फोन घेऊन काय फायदा?

हेदेखील वाचा- तब्बल 10 वर्षांनी Google बंद करतोय Chromecast स्ट्रीमिंग डिवाइसचं उत्पादन!

अनेक लोकं तर फक्त फोटोग्राफीसाठी फोन खरेदी करतात. DSLR पेक्षा फोनची किंमत कमी असते, शिवाय आपल्याला फोनमध्ये अनेक फायदे मिळतात, जे DSLR मध्ये मिळू शकत नाहीत. त्यामुळे विविध फायदे आणि उत्तम फोटोग्राफीसाठी लोकं स्मार्टफोन्सलाच प्राधान्य देतात. पण फोनचा कॅमेरा किती चांगल्या दर्जाचा असला तरी देखील आपण त्यामध्ये DSLR सारखे फोटो काढू शकत नाही, असं काहींना वाटतं. पण आपल्या फोनमध्ये DSLR सारखे फोटो काढणं अगदी सोपं आहे, यासाठी आपल्याला महागड्या फोन किंवा कॅमेऱ्याची गरज नसून काही टीप्सची गरज आहे, ज्या टीप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या सोप्या टीप्सच्या मदतीने तुम्ही DSLR सारखे भारी फोटो तुमच्या स्मार्टफोनमध्येच काढू शकता.

तुमच्या स्मार्टफोनमध्ये DSLR सारखा फोटो काढण्यासाठी काही टीप्स फॉलो करा-

प्रकाशाचा योग्य वापर

स्मार्टफोनने फोटो काढताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रकाशाचा योग्य वापर करणे. नैसर्गिक प्रकाशात फोटोची क्वालिटी चांगली राहते त्यामुळे स्मार्टफोनने फोटो काढण्यापूर्वी नैसर्गिक प्रकाश असणे महत्त्वाचे आहे. कमी प्रकाशात फोटो काढताना तुम्ही स्मार्टफोनच्या फ्लॅशऐवजी मोठ्या लाईटचा वापर करू शकता. ज्यामुळे तुमच्या फोटोमधील क्वालिटी चांगली दिसू शकेल.

स्मार्टफोन कॅमेरा लेन्स

स्मार्टफोनने फोटो काढण्यापूर्वी त्याची लेन्स साफ करावी. लेन्स स्वच्छ असल्यास फोटो अगदी स्पष्ट आणि चांगला येतो. स्मार्टफोनची लेन्स स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापडाचा वापर करावा. याशिवाय स्मार्टफोनने फोटो काढण्यापूर्वी ग्रिडलाइनचा वापर करावा. ग्रिडलाइन्सच्या वापरामुळे फोटो खूप छान दिसतो. तसेट स्मार्टफोन कॅमेऱ्याने फोटो काढण्यापूर्वी, एक्सपोजर मॅन्युअली सेट करणं गरजेचं आहे. एक्सपोजर मॅन्युअली सेट केल्यामुळे तुमच्या फोनला एक चांगली क्वालिटी मिळेल.

हेदेखील वाचा- vivo V40 आणि V40 Pro ची आज होणार धमाकेदार एंट्री! जबरदस्त कॅमेऱ्यासह मिळणार भन्नाट फीचर्स

एडिटिंग ॲप्सचा वापर करा

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधून फोटो काढण्यासाठी अनेक एडिटिंग ॲप्स देखील वापरू शकता. हे ॲप्स तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर मिळतील. या एडिटिंग ॲप्समध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट, सॅच्युरेशन आणि शार्पनेस यासारखे घटक सेट करू शकता. ज्यामुळे तुमच्या फोनला एक वेगळा लूक मिळू शकतो.

मोड्स वापरा

यास्मार्टफोनमध्ये चांगले फोटो काढण्यासाठी अनेक मोड्सचा वापर करा. स्मार्टफोनमध्ये अनेक वेगवेगळे मोड दिले जातात ज्याच्या मदतीने तुम्ही जबरदस्त HD फोटो काढू शकता. या मोड्समध्ये नाईट मोड, पोर्ट्रेट मोड असे बरेच वेगवेगळे पर्याय असतात.

Web Title: Use some easy tips before clicking photo from your smartphone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2024 | 10:38 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.