Google बंद करणार Chromecast स्ट्रीमिंग डिवाइसचं उत्पादन (फोटो सौजन्य- pinterest)
जगभरात लाखो Google युजर्स आहेत, जे Google च्या वेगवेगळ्या सेवांचा वापर करतात. आपल्या युजर्सना अधिक चांगला अनुभव मिळावा यासाठी Google देखील नवनवीन प्रोडक्ट्स लाँच करत असतो. काही वर्षांपूर्वी युजर्ससाठी Chromecast स्ट्रीमिंग डिव्हाइस Google ने लाँच केलं होतं. पण आता कंपनी या डिव्हाइसचे उत्पादन थांबवणार आहे. तब्बल 10 वर्षे बाजारात सुरु असलेलं ह्या प्रोडक्ट्सचं उत्पादन आता बंद केलं जाणार आहे. त्यामुळे युजर्सना आता Chromecast स्ट्रीमिंग डिव्हाइस खरेदी करता येणार नाही.
हेदेखील वाचा- Google Gemini AI: ‘या’ युजर्सना Gmail वर मिळणार गुगलच्या Gemini AI ची मोफत सुविधा!
मात्र Chromecast स्ट्रीमिंग डिव्हाइसच्या जागी आता कंपनी नवीन प्रोडक्ट लाँच करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे नवीन प्रोडक्ट Chromecast स्ट्रीमिंग डिव्हाइसपेक्षा अधिक चांगले फायदे देणार का आणि Chromecast स्ट्रीमिंग डिव्हाइसप्रमाणेच नवीन प्रोडक्ट लोकांच्या पसंतीस उतरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, Google ने 2013 मध्ये Chromecast स्ट्रीमिंग डिव्हाइस बाजारात लाँच केलं होतं. कंपनीच्या यशस्वी प्रोडक्ट्सपैकी एक म्हणजे Chromecast स्ट्रीमिंग डिव्हाइस. हे डिव्हाइस 10 वर्षांहून अधिक काळ बाजारात आहे.
हेदेखील वाचा- Nova सिरीजमधील Huawei Nova Flip अखेर लाँच! पावरफुल बॅटरी आणि खास फीचर्सचा समावेश
आतापर्यंत Chromecast स्ट्रीमिंग डिव्हाइसचे 100 दशलक्षाहून अधिक युनिट्स जगभरात विकले गेले आहेत. Chromecast स्ट्रीमिंग डिव्हाइस लोकांच्या पसंतीस उतरले आहे. मात्र आता कंपनीने घोषणा केली आहे की, ते Chromecast स्ट्रीमिंग डिव्हाइसचे उत्पादन बंद करणार आहे. गेल्या 10 वर्षांपासून युजर्सच्या पंसतीस उतरलेलं Chromecast स्ट्रीमिंग डिव्हाइसचे उत्पादन कंपनी अचानक का बंद करत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण जगभारतील लाखो Google युजर्स Chromecast स्ट्रीमिंग डिव्हाइसचा वापर करत आहेत. Chromecast स्ट्रीमिंग डिव्हाइसचे उत्पादन बंद झाल्यानंतर नवीन गुगल टीव्ही स्ट्रीमर लाँच केलं जाणार आहे.
Google ने 2013 मध्ये Chromecast स्ट्रीमिंग डिव्हाइस बाजारात लाँच केलं. यानंतर कमी कालावधीतच Chromecast स्ट्रीमिंग डिव्हाइस Google च्या सर्वात यशस्वी हार्डवेअर उत्पादनांपैकी एक बनले. Chromecast डिव्हाइस युजर्सना त्यांच्या टेलिव्हिजनवर फोन आणि संगणकावरून सामग्री सहजपणे स्ट्रिम करण्यास अनुमती देते. हे एक लहान, परवडणारे डोंगल आहे जे थेट टीव्हीच्या HDMI पोर्टमध्ये प्लग केले जाऊ शकते. Google चे अभियांत्रिकी, हेल्थ आणि होमचे VP मजद बकर यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिलं आहे की, मूळ Chromecast लाँच झाल्यापासून तंत्रज्ञान विकसित झालं आहे. लाखो टीव्ही डिव्हाइसेस आणि Android TV मध्ये Google Cast तंत्रज्ञान एम्बेड करण्याच्या गुंतवणुकीमुळे Chromecast च्या मागणीत आणखी वाढ झाली आहे.
कंपनीने सांगितलं आहे की, क्रोमकास्ट ऑडिओ आणि क्रोमकास्ट अल्ट्रासह 11 वर्षांच्या कालावधीत Chromecast लाइनने अनेक व्हेरिअंट निर्माण केले आहेत. पण आता Chromecast स्ट्रीमिंग डिव्हाइसचे उत्पादन बंद होणार असून कंपनी Google TV Streamer सादर करत आहे. Google TV Streamer विकसित करण्यासाठी पाऊल उचलत आहोत. Google TV Streamer हे स्ट्रीमिंग-कम-स्मार्ट होम डिव्हाइस आहे. यात Chromecast पेक्षा 22% वेगवान प्रोसेसर आहे, जो थ्रेड आणि मॅटर स्मार्ट होम मानकांना देखील सपोर्ट करतो.