अखेर तो दिवस आलाच! Vivo G3 5G धमाकेदार एंट्री, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज; किंमत 25 हजारांहून कमी
लोकप्रिय टेक ब्रँड Vivo ने त्यांच्या बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo ने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन G-सीरीज अंतर्गत लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची एंट्री Vivo G3 5G या नावाने झाली आहे. Vivo G2 5G चा सक्सेसर म्हणून Vivo G3 5G हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. Vivo G2 5G स्मार्टफोन जानेवारी 2024 मध्ये लाँच करण्यात आला होता.
कंपनीने लाँच केलेला नवीन स्मार्टफोन डीसेंट फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.74-इंच डिस्प्ले, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर, सिंगल रियर कॅमेरा, 6,000mAh बॅटरीने हा स्मार्टफोन सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन सध्या चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच केला जाणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. (फोटो सौजन्य – X)
चीनमध्ये Vivo G3 5G स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 1,499 म्हणजेच सुमारे 18,300 रुपये आणि 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 24,300 रुपये आहे. हा स्मार्टफोन सिंगल कलर ऑप्शन डायमंड ब्लॅक कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.
Vivo G3 5G मजबूत बिल्ड क्वालिटीसह लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन SGS फाइव-स्टार ड्रॉप-रेसिस्टेंट सर्टिफाइड आहे. यामध्ये 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
फोनमध्ये 6.74-इंच LCD डिस्प्ले आहे, ज्याचे रेजोल्यूशन 720×1600 पिक्सेल आहे. या डिव्हाईसमध्ये 90Hz स्क्रीन रिफ्रेश रेट, 1500:1 कॉन्ट्रास्ट रेशिओ आणि 20:9 आस्पेक्ट रेशिओ देण्यात आला आहे. स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर आणि Mali-G57 GPU वर चालतो. या डिव्हाईसमध्ये 6GB/8GB LPDDR4X रॅम आणि 256GB UFS 2.2 स्टोरेज आहे. हा स्मार्टफोन 128GB स्टोरेज वाला बेस वेरिएंट eMMC 5.1 स्टोरेजसह येतो.
Vivo G3 5G मध्ये 13-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन Android 15 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो, ज्यावर Vivo ची OriginOS 15 स्किन देण्यात आली आहे.
कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, डुअल-बँड WiFi, Bluetooth 5.4, GPS, 3.5mm ऑडियो जॅक, IR ब्लास्टर आणि USB 2.0 पोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देखील आहे.