WhatsApp ग्रुपचा ॲडमिनचं लेफ्ट झाला तर काय होईल? कोण होऊ शकतो नवीन ॲडमिन? जाणून घ्या (फोटो सौजन्य - pinterest)
तुम्ही जर WhatsApp युजर असाल तर तुम्ही नक्कीच WhatsApp वर अनेक ग्रुपचा भाग असाल. ऑफीस, कॉलेज, मित्र, फॅमिली, असे अनेक ग्रुप आपल्या WhatsApp वर असतात. जो व्यक्ति WhatsApp वर ग्रुप तयार करतो, त्याला WhatsApp ग्रुपचा ॲडमिन म्हणतात. ॲडमिन प्रत्येकाला त्या ग्रुपमध्ये सहभागी करत असतो. जर एखादा व्यक्ति आपल्याला नको असेल तर ॲडमिन त्याला ग्रुपमधून काढू शकतो. पण जर ॲडमिनचं ग्रुपमधून लेफ्ट झाला तर काय होईल? ग्रुपच्या इतर सदस्यांना सुध्दा ग्रुप सोडावा लागेल का? असे बरेच WhatsApp युजर्स आहेत, ज्यांना ग्रुप सोडण्याच्या नियमांबद्दल माहीत नाही.
हेदेखील वाचा- WhatsApp अकाउंट डिलीट आणि डिएक्टिवेटमध्ये काय फरक आहे? अकाऊंटवरील डेटा कधी रिकव्हर होतो?
आपल्याला एखादा व्यक्ति अचानकपणे एखाद्या WhatsApp ग्रुपमध्ये ॲड करतो. काहीवेळा ही व्यक्ति आपल्या ओळखीची असते तर काही वेळा अनोळखी. आपल्याला एखाद्या WhatsApp ग्रुपमध्ये राहायचं नसेल, तर आपण तो ग्रुप लेफ्ट करतो म्हणजेच ग्रुपमधून बाहेर पडतो. पण ग्रुप तयार करणारा ॲडमिनचं ग्रुपमधून लेफ्ट झाला तर इतर सदस्यांचं काय होणार? नवीन ॲडमिन कोण होणार? याबाबत आज आपण जाणून घेऊया.
WhatsApp ग्रुपच्या ॲडमिनने ग्रुप सोडल्यास काय होईल, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नाचे उत्तरही WhatsApp ने दिले आहे. WhatsApp चे म्हणणे आहे की, जर ॲडमिनने WhatsApp ग्रुप सोडला तर दुसऱ्या सदस्याची ॲडमिन म्हणून निवड केली जाते. कोणता सदस्य निवडला जाणार हे ठरलेले नाही. कंपनी कोणत्याही सदस्याला ॲडमिन बनवते. ज्या ॲडमिनने ग्रुप लेफ्ट केला आहे, त्याला पुन्हा ग्रुपमध्ये सहभागी ह्वायचे असल्यास नवीन ग्रुप ॲडमिनची परवानगी घेणे आवश्यक असेल.
हेदेखील वाचा- WhatsApp ग्रुप जॉईन करताच नवीन मेंबर्सना मिळणार Context कार्ड! काय आहे नवीन फीचर? जाणून घ्या
तसेच तुम्हाला जर आतापर्यंत कोणी कोणी ग्रुप सोडला आहे, हे तपासायचं असेल तर त्यासाठी देखील WhatsApp ने फीचर लाँच केलं आहे. ग्रुपच्या नावावर टॅप केल्यानंतर, तुम्ही खाली स्क्रोल करू शकता आणि मागील सदस्य पहा वर टॅप करू शकता. येथे त्या सदस्यांची यादी दिसते, जे पूर्वी गटाचे सदस्य होते, परंतु आता उपस्थित नाहीत. ग्रुपमधील कोणत्याही सदस्याने ग्रुप सोडल्यानंतर, त्या सदस्याचे तपशील 60 दिवस तपासले जाऊ शकतात. 2 महिन्यांनंतर, सदस्याचे तपशील मागील सहभागी सूचीमधून काढून टाकले जातात.
याशिवाय अनोळखी Whatsapp ग्रुपपासून दूर राहण्यासाठी तुम्ही तुमच्या अकाऊंटवर काही सेटिंग देखील करू शकता. सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये Whatsapp उघडा. त्यानंतर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला सेटिंगचा पर्याय उपलब्ध होईल, त्याच्यावर क्लिक करा.
सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ‘Account’ पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर ‘Privacy’ मध्ये जा. येथे तुम्हाला ‘Groups’ चा ऑप्शन येईल. ‘Groups’ चा ऑप्शन उघडा. Groups च्या ऑप्शनमध्ये ‘Everyone’, ‘My Contacts’ आणि ‘My Contacts Except’ असे तीन पर्याय उपलब्ध असतील. या पर्यायातील My Contacts सिलेक्ट केल्यानंतर कोणताही अनोळखी व्यक्ति तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करू शकणार नाही.