WhatsApp अकाउंट डिलीट आणि डिएक्टिवेटमध्ये काय फरक आहे? अकाऊंटवरील डेटा कधी रिकव्हर होतो? (फोटो सौजन्य - pinterest)
जगभरातील लोकप्रिय मॅसेजिंग ॲप म्हणजे WhatsApp. आज तुम्हाला क्वचितच अशी एखादी व्यक्ति भेटेल जी WhatsApp चा वापर करत नाही. तुम्ही सुध्दा जर WhatsApp युजर असाल तर अकाऊंट डिलीट करणं आणि डिएक्टिवेट करणं असे शब्द तुम्ही नक्कीच ऐकले असतील. पण अकाऊंट डिलीट करणं आणि डिएक्टिवेट करणं या दोन्हीमधील फरक तुम्हाला माहीत आहे का? आपल्याला सोशल मिडीयाचा कंटाळा आला की आपण सोशल मिडीयापासून काही काळ दूर राहून ब्रेक घेण्याचा विचार करतो.
हेदेखील वाचा- Meta AI ने वाचवले जीवन संपवण्यासाठी निघालेल्या मुलीचे प्राण; पोलिसांना दिला अलर्ट
सोशल मिडीयापासून दूर राहायचं असेल तर आपल्याला आपलं अकाऊंट बंद ठेवावं लागतं. अशावेळी आपल्यासमोर अकाऊंट डिलीट करणं आणि डिएक्टिवेट करणं असे दोन पर्याय उपबल्ध असतात. पण या दोन्ही मध्ये खूप फरक आहे. कारण एका प्रोसेसमध्ये आपलं संपूर्ण अकाऊंट डिलीट होतं आणि आपला डेटा रिकव्हर होऊ शकत नाही. तर दुसऱ्या प्रोसेसमध्ये आपलं अकाऊंट काही दिवसांसाठी बंद राहतं आणि डेटा रिकव्हर होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही जर तुमचं अकाऊंट बंद करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अकाऊंट डिलीट करणं आणि डिएक्टिवेट करणं या दोन्हीमधील फरक माहीत असणं गरजेचं आहे.
जेव्हा WhatsApp अकाउंट डिएक्टिवेट केले जाते तेव्हा याचा अर्थ असा होतो की अकाऊंट काही काळासाठी तात्पुरते बंद केले जाते. WhatsApp वापरकर्त्याचे अकाऊंट हटवले जात नाही. परंतु, डिएक्टिवेट अकाउंट 30 दिवसांनंतर हटविले जाते. डिएक्टिवेट अकाउंट पुन्हा नोंदणीसह सक्रिय केले जाऊ शकते. WhatsApp चे म्हणणे आहे की, जेव्हा एखाद्या वापरकर्त्याचा फोन हरवला किंवा चोरीला जातो तेव्हा WhatsApp अकाउंट डिएक्टिवेट केले पाहिजे. त्यानंतर अकऊंट नवीन फोन आणि सिम कार्डसह पुन्हा नोंदणीकृत केले जाऊ शकते.
हेदेखील वाचा- Vivo आणि Motorola स्मार्टफोनमध्ये येतेय ग्रीन लाइन; वैतागलेल्या युजर्सची कंपनीकडे तक्रार
तुमचे WhatsApp अकाउंट डिएक्टिवेट केले असले तरीही तुमचे संपर्क तुमचे प्रोफाइल पाहू शकतात. निष्क्रिय केलेल्या WhatsApp अकाउंटवर देखील संदेश पाठवले जाऊ शकतात, तथापि, हे संदेश 30 दिवसांसाठी प्रलंबित स्थितीत राहतात. डिएक्टिवेट अकाउंट 30 दिवस सक्रिय न केल्यास, अकाउंट हटविले जाते.
whatsapp अकाऊंट डिलीट करणं म्हणजे अकाऊंट पूर्णपणे नष्ट करणे. कंपनीचे म्हणणे आहे की जर whatsapp वापरकर्त्याने चुकून अकाऊंट हटवले तर ते पुन्हा संग्रहित केले जाऊ शकत नाही. whatsapp वापरकर्त्याला त्याच्या खात्यात पुन्हा प्रवेश मिळू शकत नाही.
whatsapp अकाऊंट सर्व डिव्हाईसमधून डिलीट केले जाते. whatsapp मेसेजची जुनी चॅट हिस्ट्री पुसली जाते. whatsapp वर उपस्थित असलेले सर्व ग्रुप कायमचे हटवले जातील. Google खाते बॅकअप संबंधित सर्व डेटा गमावला जाईल. चॅनल ॲडमिन आणि फॉलोअर्समधून whatsapp वापरकर्त्याला काढून टाकले. वापरकर्त्याचे whatsapp चॅनल देखील कायमचे हटवले जाईल.