गुगल मॅपच्या वॉकिंग मोड फीचरबद्दल माहीत आहे का? आता क्षणार्धात समजणार रस्ता
गुगल मॅप आपल्या प्रवासाचा सोबती असतो. आपण एकटे प्रवास करत असू किंवा आपल्या कुटूंबासोबत, पण आपल्या स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप ओपन करून रस्ता शोधणं अगदी सामान्य झालं आहे. गुगल मॅप तुम्हाला प्रत्येक ठिकाणाचा रस्ता दाखवतो. काहीवेळा आपण गुगल मॅप पाहून गोंधळात पडतो आणि रस्ता चुकतो. युजर्सच्या याच समस्या लक्षात घेऊन आता गुगल मॅपने नवं फीचर लाँच केलं आहे. वॉकिंग मोड असं या नवीन फीचरचं नाव आहे. एकटे फिरायला जा किंवा कुटूंबासोबत, गुगल मॅपचं वॉकिंग मोड फीचर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
हेदेखील वाचा- आता चुकीच्या रस्त्यापासून मिळणार सुटका! प्रवास करताना गुगल मॅपवर करा ही सेटिंग
आजकाल प्रत्येक स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप्स ॲप ईनबिल्ड असते. गुगल मॅपच्या मदतीने कोणताही मार्ग अगदी सहज शोधता येतो. पण अनेकदा गुगल मॅपमध्ये कोणत्या मार्गाने जायचे याची योग्य माहिती मिळत नसल्याची लोक तक्रार करतात. बहुतेक लोक गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गावर जातात पण रस्ता त्यांना संपूर्ण दिशा समजत नाही आणि त्यांचा प्रवास चुकतो. मात्र आता गुगल मॅपमधील ही समस्या दूर झाली आहे. गुगल मॅप्स वॉकिंग मोड फीचरच्या मदतीने युजर्सना बरीच सुविधा मिळणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
आता तुम्ही गुगल मॅप्स वॉकिंग मोड फीचरद्वारे तुमच्या गंतव्यस्थानाकडे सहज जाऊ शकता. गुगल मॅपमधील कोणताही मार्ग तुम्हाला समजत नसेल, तर फोन हातात धरून ठेवा जसे की तुम्ही फोनसोबत सेल्फी घेत आहात. हे केल्यानंतर, फोनचा कॅमेरा लोड होईल आणि त्यानंतर तुम्हाला ज्या मार्गावर जायचं आहे त्या मार्गांवर बाणांच्या खुणा तयार होतील. यानंतर हे बाण तुम्हाला कोणत्या दिशेने जायचे आहे हे सांगतील. मात्र, यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमधील गुगल मॅप्सवर एक सेटिंग करावी लागेल.
हेदेखील वाचा- गुगल मॅपही देतोय प्रभू रामांच्या अयोध्येतील प्रवासाची साक्ष, पुराणातील हा दावा ठरतोय खरा
गुगल मॅप्सच्या वॉकिंग मोडच्या मदतीने तुम्ही मार्ग स्पष्टपणे पाहू शकाल. अशा परिस्थितीत तुम्हाला नकाशात अडकण्याची गरज नाही. तथापि, कधीकधी ते लहान मार्ग देखील सुचवते, म्हणून जर तुम्ही दुचाकी किंवा इतर कोणत्याही वाहनाने प्रवास करत असाल, तर एकदा कारने तेथे पोहोचण्याचा मार्ग आहे की नाही ते तपासा. अन्यथा नंतर समस्या येऊ शकतात.