आता चुकीच्या रस्त्यापासून मिळणार सुटका! प्रवास करताना गुगल मॅपवर करा ही सेटिंग
गुगल मॅप आपल्या प्रत्येक प्रवासाचा आधार असतो. आपण एखाद्या ठिकाणी प्रवासाला निघालो आणि गुगल मॅपचा वापर केला नाही, असं क्वचितच घडतं. त्यामुळे आपल्या प्रवासासाठी आपण गुगल मॅपवर अवलंबून असतो, असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे, तो पत्ता गुगल मॅपवर सर्च केला कि त्या ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग गुगल मॅप आपल्याला दाखवतो. पण हा प्रवास करताना आपल्याला अनेकदा चुकीच्या रस्त्यांचा सामना करावा लागतो. पण आता असं होणार नाही. प्रवासादरम्यान तुम्ही गुगल मॅपचा वापर करत असाल तर तुमची देखील चुकीच्या रस्त्यांपासून सुटका होऊ शकते. यासाठी तुम्हाला गुगल मॅपमध्ये काही सेटिंग करावी लागणार आहे.
हेदेखील वाचा- गुगल मॅपवर तुमच्या घरचा पत्ता अॅड करायचा, पण प्रोसेस माहित नाही! नो टेंशन, या स्टेप्स ठरतील तुमच्यासाठी फायदेशीर
जर तुम्हाला कुठेतरी जायचे असेल आणि मार्ग माहित नसेल तर तुम्ही गुगल मॅप्सचा पर्याय निवडा. परंतु अनेकवेळा असे घडते की, तुम्ही अशा मार्गावर पोहोचता की, जिथे गाड्या चालवणं अवघड होतं. पण आता असं होणार नाही. आता गुगल मॅप तुम्हाला चुकीच्या रस्त्यांवर घेऊन जाणार नाही. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. यासाठी तुम्हाला गुगल मॅपवर या तीन सेटिंग्ज कराव्या लागतील. यानंतर, तुम्ही चुकीच्या रस्त्यावर न जाता तुमचा प्रवास अगदी आरामात पूर्ण करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
प्रवास करताना तुम्ही सर्व प्रथम, तुमचे ॲप अपडेट करा. त्यानंतर ज्या ठिकाणी जायचं आहे, तो पत्ता व्यवस्थित वाचून सर्च करा. आणि तुमच्या फोनमधील डेटा देखील तपासून पाहा. हे सर्व काम झाल्यानंतर आता तुम्हाला गुगल मॅपमध्ये काही महत्त्वाच्या सेटिंग करायच्या आहेत.
जेव्हा प्रवासादरम्यान तुम्ही गुगल मॅपवर लोकेशन निवडता, तेव्हा प्रथम तुमचा योग्य वाहन मोड निवडा, जसे की तुम्ही कारने जात असाल तर वर दिलेल्या वाहन मोड पर्यायावर क्लिक करा. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बस, बाईक असे पर्यायही निवडू शकता. कारण गुगल मॅप तुमच्या वाहनानुसार मार्गावर नेव्हिगेट करतो. जर तुम्ही गाडीने जात असाल आणि वॉकिंग मोडवर क्लिक केले असेल, तर साहजिकच तुमचे वाहन पुढे जाताना अडकू शकते. कारण रस्त्यावरून जाताना गुगल मॅप तुम्हाला चालण्याचा मार्ग दाखवेल. अशा स्थितीत त्या मार्गावरून गाडी चालवता येत नाही. त्यामुळे आपण नेहमी ज्या वाहनाने प्रवास करत आहोत तेच निवडले पाहिजे.
हेदेखील वाचा- गुगल मॅपही देतोय प्रभू रामांच्या अयोध्येतील प्रवासाची साक्ष, पुराणातील हा दावा ठरतोय खरा
याशिवाय, जर तुम्हाला खराब रस्त्यांऐवजी फक्त हायवे मार्गावरून जायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला गुगल मॅपच्या उजव्या कोपऱ्यात दिलेल्या प्रोफाइल पर्यायावर टॅप करावे लागेल. सेटिंग्जमध्ये जा येथे तुम्हाला नेव्हिगेशनचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला Avoid Highway चा पर्याय दिसेल. त्यानंतर ते इनेबल करा. मग गुगल तुम्हाला मॅपवर फक्त महामार्गाचे मार्ग दाखवेल.
गुगल मॅपच्या तिसऱ्या सेटिंगसाठी, तुमच्या फोनच्या Settings वर जा आणि Privacy and Security वर क्लिक करा. यानंतर लोकेशन सर्व्हिसवर जा आणि टॅप करा. येथे अचूक लोकेशन चालू करा. ही सेटिंग तुमचा प्रवास अधिक सोपा करेल.