Android 15 सोबत मिळत आहे 'प्रायव्हेट स्पेस', हे फिचर काय आहे? कसे काम करते? जाणून घ्या
गुगलने Android 15 लाँच केले आहे. गुगलने ही नवीन ऑपरेटिंग सिस्टीम आपल्या Pixel सीरीज स्मार्टफोन्ससाठी सादर केली आहे. Vivo, iQOO, Motorola आणि Samsung च्या काही फ्लॅगशिप फोनमध्ये Android 15 देखील उपलब्ध होऊ लागला आहे. गुगलने Android 15 मध्ये अनेक नवीन फीचर्स जोडले आहेत, ज्यामध्ये प्रायव्हसी फीचर प्रायव्हेट स्पेस देखील समाविष्ट केले आहेत. त्याच्या मदतीने डेटा सुरक्षित ठेवण्यास मदत होते. आता हे फिचर नक्की काय आहे आणि कसे काम करते याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
वेगळे व्हर्च्युअल स्पेस क्रिएट करता येते
वास्तविक, Android 15 चे हे फिचर एक वेगळे व्हर्च्युअल स्पेस क्रिएट करते. यामध्ये यूजर्स त्यांचा संवेदनशील डेटा सुरक्षित ठेवू शकतात. युजर्स यामध्ये फोटो, व्हिडिओ आणि फाइल्स सेव्ह करू शकतात, ज्यात कोणीही प्रवेश करू शकणार नाही. यामध्ये तुम्ही Google Photos, Files, Chrome, Screenshots च्या डुप्लिकेट फाइल्स देखील सेव्ह करू शकता.
हेदेखील वाचा – गुगलच्या लेटेस्ट OS’चे रोलआउट सुरू, सर्वात पहिले या स्मार्टफोन्सना मिळणार अपडेट
ॲप्सना सहज हाइड करू शकता
विशेष बाब म्हणजे युजर्सला जे ॲप हाइड करायचे असेल ते जनरल ॲप ड्रॉरमध्ये दिसणार नाही. प्रायव्हेट स्पेस ॲप्सवर लॉक आयकॉन दिसेल, जो तुमचा डेटा सुरक्षित असल्याचे दर्शवेल. युजर्स त्यांच्या फोनमधील प्रायव्हेट स्पेस लॉक आणि अनलॉक करू शकतात. याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – Jio-Airtel-Vi-BSNL युजर्सने लक्ष द्या! संपूर्ण जगाला मागे सारत सरकार आणत आहे 6G इंटरनेट
Private Space कसे एनॅबल करावे?