
WhatsApp चॅटची थीम बदला किंवा लो लाईटमध्ये व्हिडीओ कॉल करा, प्रत्येक काम होणार मजेदार!
व्हॉट्सॲप आपल्या युजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी सतत नवनवीन फीचर्स लाँच करत असते. प्रत्येक फीचर नंतर युजर्सचा व्हॉट्सॲप वापरण्याचा अनुभव अधिक मजेदार होतो. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सॲपने त्यांच्या युजर्साठी चॅट थीम फीचर लाँच केलं होतं. त्यानंतर आता कंपनीने पुन्हा एक नवीन फीचर सादर केलं आहे. लो लाईटमध्ये व्हिडीओ कॉल करताना हे नवीन फीचर अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या फीचरच्या मदतीने कमी प्रकाशातही उत्तम क्वालिटीसह व्हिडिओ कॉल करता येणार आहे.
हेदेखील वाचा- तुमच्या WhatsApp वर आत्ताच सेव्ह करा ‘हे’ 4 नंबर! तुमच्या अनेक समस्या चुटकीसरशी दूर होतील
अंधारात किंवा कमी प्रकाशात व्हिडीओ कॉल करताना अनेक समस्या निर्माण होतात. तसेच व्हिडीओ कॉलची क्वालिटी देखील चांगली नसते. युजर्सच्या या समस्येवर आता कंपनीने उपाय आणला आहे. व्हॉट्सॲपने अक नवीन फीचर लाँच केलं आहे. या नवीन फीचरमुळे आता तुम्हाला व्हिडिओ कॉलिंगमध्ये येणाऱ्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही आणि गुणवत्ता देखील उत्कृष्ट असेल. (फोटो सौजन्य – pinterest)
नवीन फीचर कमी प्रकाशातही व्हिडिओच्या क्वालिटीवर परिणाम करणार नाही. जर तुम्ही अशा ठिकाणी व्हिडिओ कॉल करत असाल जिथे कमी प्रकाश असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला व्हिडिओच्या क्वालिटीसोबत तडजोड करावी लागणार नाही. उलट, तुम्ही लो लाईट फीचर सुरू करताच, चांगली क्वालिटी येण्यास सुरुवात होईल. व्हॉट्सॲपचे नवीन फीचर संपूर्ण प्रकाश वाढवण्याचे काम करते. जेव्हा आपण घराबाहेर अजिबात प्रकाश नसलेल्या ठिकाणी असतो तेव्हा हे फीचर खूप उपयुक्त ठरेल.
हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही युजर्ससाठी आणले गेले आहे. सध्या हे फीचर कायमस्वरूपी वापरण्याचा पर्याय नाही. त्यामुळे यूजर्सला प्रत्येक व्हिडिओ कॉलवर हे फीचर सुरू करावे लागेल. येत्या काही दिवसांत ते विंडोज व्हॉट्सॲपसाठीही सादर केले जाणार आहे.
हेदेखील वाचा- रिल्स पाहण्याची मज्जा आता WhatsApp वरही घेता येणार, Meta AI करणार तुमची मदत