रिल्स पाहण्याची मज्जा आता WhatsApp ही येणार, Meta AI करणार तुमची मदत
मेटाचे लोकप्रिय चॅटिंग ॲप व्हॉट्सॲप आता प्रत्येक दुसरा स्मार्टफोन वापरकर्ता वापरत आहे. व्हॉट्सॲप हे केवळ चॅटिंगचे माध्यम नाही तर कॉलिंग आणि फाइल शेअरिंगचेही माध्यम आहे. इंटरनेट सुरू असल्यास, अनेकांना व्हॉट्सॲपवरही कॉल करणे आवडते. जगात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपची क्रेझ भारतातही मोठ्या प्रमाणावर आहे. वापरकर्त्यांची गोपनीयता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन, व्हॉट्सॲपने अशी अनेक वैशिष्ट्ये सादर केली आहेत.
हेदेखील वाचा- WhatsApp युजर्सना मिळाली सुपरपॉवर! आता चॅट्सचा लूक बदलणार, लवकरच येतय नवीन फीचर
लोकप्रिय मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपचा वापर फोटो-व्हिडिओ शेअरिंग आणि टेक्स्टिंग तसेच व्हिडिओ कॉलिंगसाठी केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की, आता तुम्ही इंस्टाग्रामप्रमाणे व्हॉट्सॲपवरही इंस्टाग्राम रील्स पाहू शकता. व्हॉट्सॲपवर एक नवीन अपडेट आलं आहे. या नवीन अपडेटमुळे तुम्ही व्हॉट्सॲपवरही रील्स पाहू शकता. यासाठी तुम्हाला Meta AI मदत करणार आहे. यावर तुमचा विश्वास बसत नसला, तरी देखील हे खरं आहे. तुमच्या व्हॉट्सॲपवर दिसणारे निळे सर्कल आता तुम्हाला मदत करणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
व्हॉट्सॲप रिल्स पाहण्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त Meta AI मध्ये एक छोटा प्रॉम्प्ट टाकायचा आहे. उदाहरणार्थ, जर मला एखाद्या बॉलीवूड अभिनेत्याचे रिल्स पाहायचे असतील तर तुम्हाला Meta AI मध्ये बॉलीवूड अभिनेता रिल्स, असं लिहावं लागेल. यानंतर इंस्टाग्रावर असलेल्या बॉलीवूड अभिनेत्यांचे रिल्स तुम्हाला व्हॉट्सॲपवर पाहता येणार आहेत. आवडत्या इंफ्लूएंसरची रील देखील पाहू शकता.
हेदेखील वाचा- टेलिग्राम बंद झालं तर होईल मोठं नुकसान? युजर्सना मिळणार नाहीत ‘हे’ फीचर्स; WhatsApp पेक्षा टेलिग्रामला दिली जाते अधिक पसंती
तुम्ही रीलवर क्लिक केल्यास तुम्हाला Instagram अकाऊंटवर पाठवले जाईल. म्हणजे, तुम्हाला फक्त इंस्टाग्रामवर रील दिसेल पण पद्धत थोडी वेगळी असेल. येथे तुम्ही तुमच्या आवडत्या इंफ्लूएंसरच्या रील देखील पाहू शकता. त्यासाठीही तुम्हाला Meta AI मध्ये तुमच्या आवडत्या इंफ्लूएंसरचं नाव टाईप कराव लागेल.
व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सॲप कॉल रिंगटोन बदलण्याची सुविधा देखील प्रदान करते. WhatsApp रिंगटोनसाठी तुम्ही तुमच्या फोनमध्ये असलेली फक्त ऑडिओ फाइल वापरू शकता. सर्वप्रथम तुम्हाला फोनवर व्हॉट्सॲप ओपन करावे लागेल. आता तुम्हाला ॲपच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या मेनूवर टॅप करावे लागेल. आता तुम्हाला येथे सेटिंग्ज पर्यायावर टॅप करावे लागेल. येथे तुम्हाला Notifications पर्यायावर टॅप करावे लागेल. आता तुम्हाला खाली स्क्रोल करून कॉल्सवर यावे लागेल. आता तुम्हाला रिंगटोन पर्यायावर टॅप करावे लागेल. आता तुम्हाला संगीत किंवा ऑडिओ फाइलवर टॅप करावे लागेल. येथून तुम्ही तुमचे आवडते गाणे WhatsApp रिंगटोन म्हणून सेट करू शकता.
तुम्ही तुमच्या वैयक्तिक चॅट डिलीट किंवा Archive न करता सुध्दा हाईड करू शकता. सर्व प्रथम WhatsApp उघडा.
आता तुम्हाला जी चॅट लपवायची आहे ती निवडा. प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा. खाली स्क्रोल करा आणि चॅट लॉक टॉगल चालू करा.