फोटो सौजन्य - pinterest
लोकप्रिय मॅसेजिंग ॲप WhatsApp त्यांच्या युजर्ससाठी सतत काहीतरी नवीन घेऊन येते. WhatsApp वर सतत येणाऱ्या या नवीन फीचर्समुळे युजर्ससाठी WhatsApp वापरणं अधिक सोपं झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून युजर्सना चांगला अनुभव देण्याच्या उद्देशाने WhatsApp सतत नवीन अपडेट घेऊन येत आहे. यापूर्वी WhatsApp केवळ मॅसेज, कॉल, फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यासाठी वापरले जात होते. मात्र आता WhatsApp च्या मदतीने अनेक कामं केली जाऊ शकतात. पैसे ट्रान्सफर करणे, फोटो एडीट करणे, इव्हेंटसाठी कॅलेंडर तयार करणं, ही सर्व काम आपण WhatsApp च्या मदतीने करू शकतो.
हेदेखील वाचा- WhatsApp वर लाँच झालं नवं फीचर! आता युजर्स महत्त्वाची चॅट्स ठेऊ शकतील सुरक्षित
फक्त कॉल आणि मॅसेजसाठी वापरला जाणारा WhatsApp आता अनेक कामांसाठी वापरला जात आहे. WhatsApp च्या नवनवीन अपडेटमुळे युजर्सची कामं अधिक सोपी होतात. आता देखील WhatsApp त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन अपडेट लाँच करणार आहे. WhatsApp अँड्रॉईड आणि IOS या दोन्ही युजर्ससाठी वेगवेगळे अपडेट लाँच करणार आहे. या नवीन फीचरअंतर्गत युजर्स ग्रुप आणि लोकांना मॅनेज करू शकतात. हे अपडेट विकासाच्या टप्प्यात आहे आणि लवकरच ते बीटा परीक्षकांसाठी सादर केले जाईल. तर WhatsApp IOS युजर्ससाठी इमोजीचे एक खास फीचर घेऊन येणार आहे. तुम्ही जर टेलिग्राम युजर असाल तर तुम्हाला या अपडेटबाबत कल्पना येईल.
हेदेखील वाचा- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाकिस्तानने तयार केला WhatsApp सारखा Beep Pakistan मॅसेजिंग ॲप!
WhatsApp च्या या दोन्ही अपडेटबाबत WABetaInfo माहिती दिली आहे. यासोबतच WABetaInfo ने एक स्क्रिनशॉट देखील शेअर केला आहे. हा नवीन ऑप्शन कुठे उपलब्ध असेल आणि युजर्स कशा प्रकारे हा ऑप्शन ऑपरेट करू शकतील यासाठी कंपनीने एक स्क्रिनशॉट देखील शेअर केला आहे. अँड्रॉईड युजर्ससाठी लांँच केल्या जाणाऱ्या अपडेटबाबत WABetaInfo ने सांगितलं आहे की, या नवीन फीचरअंतर्गत अँड्रॉईड युजर्स ग्रुप आणि लोकांना मॅनेज करू शकतात.
हे अपडेट विकासाच्या टप्प्यात आहे आणि लवकरच ते बीटा परीक्षकांसाठी सादर केले जाईल. हे अपडेट विशेषतः अशा युजर्ससाठी उपयुक्त आहे ज्यांच्या फोनवर अधिक संपर्क आहेत आणि चॅटिंगद्वारे ते अधिक लोकांशी कनेक्ट राहतात.या फीचरच्या माध्यमातून तुम्हाला कोण किती महत्त्वाचे आहे, आणि कोणत्या क्रमांकावर राहिल हे कस्टमाइझ करण्याची सुविधा मिळेल.
WhatsApp च्या IOS अपडेटबाबत WABetaInfo ने सांगितलं की, युजर्सना ॲनिमेटेड इमोजी ऑफर केल्या जाणार आहेत. सध्या हे अपडेट केवळ बीटा परीक्षकांसाठी उपलब्ध आहे. मात्र लवकरच ते सर्वांसाठी लाँच केलं जाणार आहे. ॲनिमेटेड स्टिकर्स सध्याच्या स्टिकर्सपेक्षा वेगळे कसे असतील, असा प्रश्न तुमच्याही मनात आलाय का? तुम्ही जर टेलिग्राम युज असाल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर अगदी सहज मिळेल. टेलिग्रामवर ज्या प्रमाणे ॲनिमेटेड स्टिकर्सचा वापर केला जातो, ज्यामुळे चॅटिंग अधिक मजेदार होते, आता असंत फीचर WhatsApp वर देखील उपलब्ध होणार आहे.