फोटो सौजन्य- pinterest
WhatsApp नेहमीच त्यांच्या युजर्ससाठी काही ना काही खास घेऊन येत असतो. WhatsApp च्या नव्या फीचर्समुळे युजर्सना एक उत्तम अनुभव मिळतो. तसेच काही फीचर्स तर इतके अप्रतिम असतात की युजर्सची कामं अगदी चुटकीसरशी होतात. WhatsApp त्यांच्या युजर्ससाठी दररोज नवनवीन फीचर्स सादर करत आहे. आता अलीकडेच WhatsApp वर Favorites चा पर्याय जोडण्यात आला आहे. ह्या पर्यायामुळे युजर्स त्यांचे महत्त्वाचे आणि आवडते चॅट्स वेगळ्या टॅबमध्ये आणि सुरक्षित ठेऊ शकतात.
हेदेखील वाचा- AI गॅझेट ‘Friend’ झालाय लाँच! तुमचा एकटेपणा दूर करण्यासाठी ठरेल फायदेशीर
WhatsApp ने सांगितलं आहे की, Favorites फीचरमुळे युजर्स त्यांचे महत्त्वाचे आणि आवडते चॅट्स वेगळ्या टॅबमध्ये ठेऊ शकतात. आपल्या फोनमध्ये शेकडो कॉन्टॅक्ट्स असतात. आपल्याला ऐनवेळी एखाद्या व्यक्तिचा संपर्क शोधायचा असेल तर खूप मेहनत करावी लागते. पण Favorites फीचरमुळे तुमचं हे काम अधिक सोपं होणार आहे. तुम्ही तुमचे आवडते आणि महत्त्वाचे चॅटस आणि संपर्क Favorites फीचरमध्ये ॲड करू शकता. त्यामुळे कधीही गरज पडली तर तुम्हाला शेकडो नंबरमधून कॉन्टॅक्ट शोधण्याची गरज भासणार नाही.
हेदेखील वाचा- OnePlus Open ची स्पेशल एडिशन ‘या’ दिवशी होणार लाँच! जाणून घ्या काय आहेत खास फीचर्स
आपल्या फोनमध्ये देखील कॉन्टॅक्ट ॲपमध्ये Favorites फीचर देण्यात आलेलं असतं. आपल्याला ज्या व्यक्तिना सतत संपर्क करण्याची गरज भासते किंवा ज्या व्यक्तिंचे संपर्क महत्त्वाचे आहेत, असे नंबर आपण Favorites फीचरमध्ये ॲड करतो. ज्यामुळे आपल्याला कधीही गरज लागली तर आपण हे नंबर त्वरीत शोधू शकतो. आता असंच फीचर WhatsApp वर देखील लाँच करण्यात आलं आहे. त्यामुळे आता WhatsApp चॅट लिस्टमध्ये तुमच्यासाठी महत्त्वाचे असलेले कॉन्टॅक्ट शोधण्याची गरज भासणार नाही. Favorites लिस्टमध्ये ॲड केल्यानंतर असे संपर्क वेगळे दिसतील.