फोटो सौजन्य - pinterest
WhatsApp त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन फीचर लाँच करत असतं. या नवीन फीचरमुळे WhatsApp युजर्सचा अनुभव अधिक चांगला होतो. आता WhatsApp ने पुन्हा एकदा एका नव्या फीचरची घोषणा केली आहे. WhatsApp त्यांच्या युजर्ससाठी लवकरच डबल टॅप रिअॅक्शन फीचर लाँच करणार आहे. या फीचरच्या मदतीने WhatsApp युजर्स मॅसेजवर केवळ डबल टॅप करून रिअॅक्शन देऊ शकतील. हे फीचर Instagram फीचरप्रमाणे काम करणार असल्याचं सांगितलं जात आहे. ज्याप्रमाणे Instagram युजर्स डबल टॅप करून करून एखाद्या मॅसेजवर रिअॅक्शन देऊ शकतात. तसंच आता WhatsApp युजर्स देखील डबल टॅप करून करून एखाद्या मॅसेजवर रिअॅक्शन देऊ शकणार आहेत.
हेदेखील वाचा- दमदार फीचर्ससह Realme लाँच करणार सर्वात स्वस्त स्मार्टफोन! काय आहे किंमत जाणून घ्या
डबल टॅप रिअॅक्शन फीचरच्या मदतीने यूजर्स फोटो, व्हिडिओ आणि GIF वर फक्त डबल टॅप करून प्रतिक्रिया देऊ शकतील. WhatsApp च्या या नव्या फीचरबाबत WABetainfo ने माहिती दिली आहे. WABetainfo ने या फीचरबाबत X वर पोस्ट केलं आहे. X वर पोस्ट करण्यात आलेल्या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही या फीचरची झलक पाहू शकता. या फीचरच्या नावाप्रमाणे, तुम्ही फोटो, व्हिडिओ आणि GIF वर डबल टॅप करून तुमची प्रतिक्रिया देऊ शकाल. यासोबतच, कंपनी आता चॅटिंगचा अनुभव सुधारण्यासाठी जलद शॉर्टकटवर देखील वेगाने काम करत आहे.
WhatsApp is working on a new double-tap message reaction feature for Android beta!
WhatsApp is now developing a new feature to allow users to quickly react to messages with a double-tap, and it will be available in a future update!https://t.co/HNLgBlQy48 pic.twitter.com/NZq74BdcNC
— WABetaInfo (@WABetaInfo) July 28, 2024
हेदेखील वाचा- Xiaomi चे ‘हे’ फोन End Of Life लिस्टमध्ये झाले सहभागी; तुमचा फोन तर नाही ना जाणून घ्या
यासोबतच WhatsApp आणखी एका फीचरवर काम करत आहे. डबल टॅप रिअॅक्शन फीचरसोबतच WhatsApp लवकरच स्टेटस रिशेअर फीचर देखील लाँच करणार आहे. आता पर्यंत युजर्स केवळ Instagram वर स्टोरी रिशेअर करू शकत होते. मात्र आता हे फीचर लवकरच WhatsApp वर देखील येणार आहे. त्यामुळे आता WhatsApp युजर्स देखील स्टेटस रिशेअर करू शकणाार आहेत. WhatsApp च्या अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.24.1.6.4 मध्ये हे फिचर दिसणार आहे. सध्या हे फिचर विकासाच्या टप्प्यात आहे. या फीचरमध्ये युजर्सना स्टेटस रिशेअर करण्यासाठी क्विक शॉर्टकट बटण मिळणार आहे. यामध्ये यूजर्सना इमोजी आणि पोस्ट अपडेट करण्याचा पर्यायही मिळणार आहे.
याशिवाय WhatsApp सध्या आणखी एका फीचरवर काम करत आहे. या अपडेटमुळे युजर्स इंटरनेट शिवाय देखील मोठ्या फाईल त्यांच्या WhatsApp मधून शेअर करू शकतात. त्यामुळे आता WhatsApp वर कोणतीही फाईल शेअर करायची असेल तर आपल्याला इंटरनेटची गरज भासणार नाही. WhatsApp चं हे नवीन फीचर युजर्ससाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. WhatsApp चं हे फिचर देखील लवकरच लाँच केलं जाणार आहे.