crime (फोटो सौजन्य: social media )
WhatsApp चा वापर हे संपूर्ण जगभर करण्यात येत आहे. कंपनी नवीन नवीन फीचर्स आणत आहे. दरम्यान WhatsAppची कंपनी आता नवीन फीचरची चाचणी करतांना दिसली आहे. हा इन्स्टंट मेसेजिंग अॅप लवर्करच एक नवीन AI फीचर आणत आहे. कंपनी AI राइटिंग हेल्प असिस्टेंट फीचर आणणार आहे. जे वापरकर्त्यांना संदेश लिहिण्यास सुचवेल. आता तुम्हाला मेसेजही संदेशाचे उत्तर देण्यासाठी जास्त विचार करावा लागणार नाही, उलट एआय तुमच्यासाठी एक चांगले उत्तर तयार करेल. हे फिचर पूर्णतः प्राइवेट प्रोसेसिंगवर काम करेल आणि तुम्हाला कोणत्याही मेसेजला जलद उत्तर देण्यास मदत करेल. सध्या, हे फीचर अँड्रॉइडसाठी व्हॉट्सअॅपच्या नवीनतम बीटा व्हर्जनमध्ये पाहिले गेले आहे. चला या फिचर बद्दल जाणून घेऊयात.
वेगवेगळ्या टोनमध्ये मेसेज लिहिणार
WABetaInfo या फीचर ट्रॅकरने अलिकडच्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म AI रायटिंग हेल्प असिस्टंट फीचरची चाचणी घेत आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांचे मेसेज पाठवण्यापूर्वी ते सुधारण्यासाठी वेगवेगळ्या टोनमध्ये मेसेज मिळू शकतील, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांचे मेसेज कस्टमाइझ करता येतील. हे फीचर सुरुवातीच्या चाचणीत असल्याचे वृत्त आहे.
राइटिंग हेल्प असिस्टेंट मेटाच्या खाजगी प्रक्रिया तंत्रज्ञानाचा वापर करेल असे वृत्त आहे. हे नवीन वैशिष्ट्य संदेशातील सामग्री किंवा त्याच्याशी संबंधित डेटा जतन करणार नाही, परंतु डेटा जतन न करता संदेशाच्या प्रतिसादात अनेक सूचना देईल.
या फीचरची पहिली झलक देखील पाहिली
रिपोर्टमध्ये रायटिंग हेल्प असिस्टंट फीचरचा स्क्रीनशॉट देखील शेअर करण्यात आला आहे, जो या फीचरची पहिली झलक देतो. स्क्रीनशॉटमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की वापरकर्ता काही शब्द टाइप करताच, स्टिकर आयकॉनच्या जागी एक विशेष पेन दिसते, जे या रायटिंग हेल्प फीचरला चालू करण्यास मदत करते. तुम्ही या विशेष पेनवर क्लिक करताच, AI काही मैसेज सुचवते.
Jio च्या दोन प्लान्समध्ये सर्व काही Free! Netflix, कॉलिंग डेटा मिळणार एकत्र, जाणून घ्या