
Amazon Vs Flipkart: ब्लॅक फ्राइडे सेलमध्ये कोणत्या प्लॅटफॉर्मवर स्वस्त मिळणार iPhone 17 Pro? जाणून घ्या सविस्तर
WhatsApp चे नवीन ‘About’ फीचर रोलआउट, यूजर्स शेअर करू शकतात रोजचे अपडेट्स! असं काम करणार नवं अपडेट
Apple च्या लेटेस्ट iPhone 17 Pro वर दोन्ही प्लॅटफॉर्म फ्लॅट डिस्काऊंट ऑफर करत नाही. मात्र दोन्ही प्लॅटफॉर्म या आयफोन मॉडेलच्या खरेदीवर उत्तम बँक ऑफर्स देत आहेत. त्यामुळे ग्राहकांना आयफोनच्या खरेदीवर सूट मिळणार आहे. पण दोन्ही प्लॅटफॉर्म्सपैकी कोणत्या प्लॅटफॉर्मवर iPhone 17 Pro ची किंमत कमी आहे, याबाबतच अनेक यूजर्सच्या मनात गोंधळ आहे. आता हाच गोंधळ आम्ही दूर करणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest)
iPhone 17 Pro आता Amazon आणि Flipkart या दोन्ही ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 1,34,900 रुपयांच्या लाँच किंमतीत लिस्टेड आहे. मात्र या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान iPhone 17 Pro च्या खेरदीवर काही डिल्स उपलब्ध आहेत. सर्वात आधी फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या डिलबाबत जाणून घेऊया.
फ्लिपकार्टवर ICICI बँक क्रेडिट कार्ड EMI आणि IDFC बँक क्रेडिट कार्ड EMI, नॉन EMI आणि SBI Credit Card EMI आणि Non EMI वर 3000 रुपयांपर्यत डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. याशिवाय फ्लिपकार्ट एक्सचेंज वॅल्यूव्यतिरिक्त 3,000 रुपयांचे एक्स्ट्रा डिस्काऊंट देखील देत आहे, ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होणार आहे आणि तुम्हाला हा आयफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
Chrome यूजर्स सावधान! सरकारी एजेंसीने दिला इशारा, हॅकर्सपासून वाचण्यासाठी लगेचच करा ‘हे’ काम
Amazon या फोनच्या खरेदीवर अनेक आकर्षक ऑफर्स देत आहे. जर तुम्ही SBI क्रेडिट कार्ड EMI ऑप्शनचा वापर करून आयफोन खरेदी करणार असाल तर तुम्हाला 4 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. याशिवाय ICICI बँक क्रेडिट कार्डवर देखील 4 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आयडीएफसी फर्स्ट बँक क्रेडिट कार्ड ईएमआय पर्यायांवर 4 हजार रुपयांपर्यंत सूट देखील देत आहे. जर आपण ते काळजीपूर्वक पाहिले तर, Amazon सध्या एक चांगली डील देत आहे. बँक ऑफरनंतर, फोनची किंमत 1,30,900 रुपयांपर्यंत घसरते.
iPhone 17 Pro च्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये 6.3 इंचाचा Super Retina XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये A19 चिपसेट देण्यात आला आहे, जो 6-कोर प्रोसेसर आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे, ज्यामध्ये सर्व सेंसर 48 मेगापिक्सल आहेत. यावेळी 18 मेगापिक्सेलचा एक चांगला सेल्फी कॅमेरा देखील उपलब्ध आहे.
Ans: वापरावर अवलंबून, साधारणपणे एक संपूर्ण दिवस आरामात चालते. Pro Max मॉडेल्समध्ये बॅटरी लाइफ जास्त असते.
Ans: नाही. iPhone मध्ये एक्सटर्नल SD कार्ड सपोर्ट नसतो.
Ans: नवीन iPhones (iPhone 15 पासून) USB Type-C पोर्ट वापरतात.