Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Upcoming Smartphones: सप्टेंबरमध्ये होणार राडा! मोठ्या टेक कंपन्या लाँच करणार तगडे स्मार्टफोन्स, स्पेसिफिकेशन्स आले समोर

Upcoming Smartphones September 2025: सप्टेंबरमध्ये मोठा धमाका होणार आहे. कारण सप्टेंबरमध्ये अनेक मोठ्या टेक कंपन्या त्यांचे स्मार्टफोन्स लाँच करणार आहेत. या स्मार्टफोन्सची यादी देखील समोर आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 26, 2025 | 11:29 AM
Upcoming Smartphones: सप्टेंबरमध्ये होणार राडा! मोठ्या टेक कंपन्या लाँच करणार तगडे स्मार्टफोन्स, स्पेसिफिकेशन्स आले समोर

Upcoming Smartphones: सप्टेंबरमध्ये होणार राडा! मोठ्या टेक कंपन्या लाँच करणार तगडे स्मार्टफोन्स, स्पेसिफिकेशन्स आले समोर

Follow Us
Close
Follow Us:

ऑगस्ट महिन्यात गूगलसह अनेक टेक कंपन्यांनी त्यांचे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यामध्ये गूगल पिक्सेल 10 सीरीज, वीवो V60 सारख्या अनेक स्मार्टफोन्स कंपन्यांचा समावेश आहे. स्मार्टफोन्स कंपन्यांनी ऑगस्ट महिना पूर्णपणे गाजवला आहे. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात देखील मोठा राडा होणार आहे. जगातील मोठ्या टेक कंपन्या सप्टेंबर महिन्यात त्यांचे प्रिमियिम डिव्हाईस लाँच करणार आहेत.

चीनला मागे टाकत भारत अव्वल स्थानावर! अमेरिकेत एक्सपोर्ट केले तब्बल इतके स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

सप्टेंबर महिना टेक लवर्ससाठी अत्यंत खास असणार आहे. या महिन्यात अ‍ॅपल, सॅमसंग, ओप्पो, मोटोरोला आणि लावासारख्या अनेक मोठ्या कंपन्या त्यांचे स्मार्टफोन्स लाँच करणार आहेत. या स्मार्टफोन्सची यादी देखील समोर आली आहे. हे स्मार्टफोन अनेक प्रिमियम आणि बहुप्रतिक्षित डिव्हाईसचा समावेश असणार आहे. चला तर मग सप्टेंबरमध्ये लाँच होणाऱ्या डिव्हाईसबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

Apple iPhone 17 सीरीज

9 सप्टेंबर रोजी iPhone 17 सीरीज लाँच केली जाणार आहे. या सिरीजमध्ये iPhone 17, iPhone 17 Air (जे प्लस मॉडेलची जागा घेईल), iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max यांचा समावेश असणार आहे. यावेळी आयफोन सिरीजमध्ये नवीन डिझाईन आणि नवीन स्पेसिफिकेशन्स पाहायला मिळणार आहेत. सप्लाय चेन आणि कर आकारणीमुळे किंमती पूर्वीपेक्षा जास्त असू शकतात. आगामी आयफोनबाबत सतत नवीन अपडेट्स रिलीज केले जात आहेत.

Samsung Galaxy S25 FE

सॅमसंगचा Galaxy S25 FE हा स्मार्टफोन 5 सप्टेंबर रोजी लाँच केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा स्मार्टफोन फ्लॅट फ्रेम, ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि पाच रंगात लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच AMOLED डिस्प्ले, 8GB रॅम आणि 5,000mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. भारतात या स्मार्टफोनची किंमत सुमारे 62,999 रुपये असू शकते.

Oppo F31 सीरीज

स्मार्टफोन कंपनी ओप्पो 12 ते 14 सप्टेंबरदरम्यान भारतात त्यांची नवीन F31 सीरीज लाँच करू शकते. या सिरीजमध्ये Oppo F31, F31 Pro आणि F31 Pro+ यांचा समावेश असणार आहे. लिक्सनुसार, सर्व मॉडेल्समध्ये 7,000mAh बॅटरी दिली जाणार आहे. Pro+ वर्जन Snapdragon 7 Gen 3 चिपसेटने सुसज्ज असणार आहे. तर Pro आणि बेस मॉडल Dimensity 7300 आणि 6300 ने सुसज्ज असणार आहे.

Motorola Razr 60 Swarovski Edition

1 सप्टेंबर रोजी भारतात मोटोरोलाचे लिमिटेड Razr 60 Swarovski Edition लाँच केले जाणार आहे. यामध्ये 35 Swarovski क्रिस्टल आणि 3D क्विल्टेड फिनिश दिला जाणार आहे. या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स ओरिजिनल Razr 60 सारखेच असणार आहेत. या स्मार्टफोनमध्ये 6.9-इंच LTPO pOLED डिस्प्ले, 50MP डुअल रियर कॅमेरा, 32MP फ्रंट कॅमेरा आणि 4,500mAh बॅटरी दिली जाणार आहे.

Free Fire Max: मोफत मिळवा डायमंड्स, स्किन्स आणि बक्षिसे! आजच रिडीम करा कोड्स आणि जिंका खास रिवॉर्ड्स

Lava Agni 4

लावा देखील सप्टेंबर महिन्यात त्यांचा नवीन Lava Agni 4 स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन Agni 3 चा सक्सेसर असणार आहे. या आगामी स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि लाँच डेट अद्याप जाहिर करण्यात आली नाही. परंतु असे अपेक्षित आहे की ते त्याच्या मागील मॉडेलपेक्षा थोडे महाग असेल.

Web Title: Which smartphones are going to launch in september 2025 know about the list tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 11:29 AM

Topics:  

  • google pixel
  • iphone
  • samsung

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A07 4G: Samsung चा नवीन Smart फोन लाँच, 7,500 रुपये सुरुवातीची किंमत आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज
1

Samsung Galaxy A07 4G: Samsung चा नवीन Smart फोन लाँच, 7,500 रुपये सुरुवातीची किंमत आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

लवकरच लाँच होणार Samsung Galaxy S25 FE, स्पेसिफिकेशन्स आले समोर! जाणून घ्या सविस्तर
2

लवकरच लाँच होणार Samsung Galaxy S25 FE, स्पेसिफिकेशन्स आले समोर! जाणून घ्या सविस्तर

या स्मार्टफोन युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता WhatsApp वर होणार सॅटेलाइट नेटवर्क कॉलिंग, 28 ऑगस्टपासून रोलआऊट होणार फीचर
3

या स्मार्टफोन युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता WhatsApp वर होणार सॅटेलाइट नेटवर्क कॉलिंग, 28 ऑगस्टपासून रोलआऊट होणार फीचर

iPhone 17 Series: अखेर मुहूर्त ठरलाच! आगामी आयफोनची लाँच डेट Leak, कंपनीची एक चूक आणि जगाला मिळाली माहिती!
4

iPhone 17 Series: अखेर मुहूर्त ठरलाच! आगामी आयफोनची लाँच डेट Leak, कंपनीची एक चूक आणि जगाला मिळाली माहिती!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.