या व्यक्तिने तयार केली सर्वात पहिली Ghibli इमेज, क्षणातच इंटरनेटवर सुरु झाला ट्रेंड... अनोखी कहाणी तुम्ही वाचलीत का?
सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Ghibli ईमेजने धुमाकूळ घातला आहे. प्रत्येक सोशल मीडिया युजर त्यांच्या फोटोचे Ghibli ईमेज तयार करत आहेत. कोणी स्वत:ची Ghibli ईमेज तयार करत आहे तर कोणी त्यांच्या कुंटूबाची. तर कोणी त्यांच्या पार्टनरची Ghibli तयार करत होतं तर कोणी त्यांच्या मैत्रिणींची. AI टूल्स चॅटजीपीटी, ग्रोक सोशल मीडिया युजर्सना Ghibli ईमेज तयार करण्यासाठी मदत करत आहेत. Ghibli ट्रेंडने जगभरात खळबळ उडवून दिली आहे.
Ghibli ईमेज तयार करण्यासाठी लोकांमध्ये इतकं क्रेझ निर्माण झालं होतं की, अक्षरश: ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून लोकांना थोडा धीर धरायला सांगितलं. पोस्टमध्ये सॅम ऑल्टमन यांनी म्हटलं होतं की, त्यांच्या सर्व्हरवर खूप दबाव आहे. त्यांच्या टीमला झोपेची गरज आहे, त्यामुळे लोकांनी Ghibli ईमेज तयार करताना थोडा धीर धरावा. या पोस्टनंतर देखील लोकांमध्ये Ghibli ईमेजचा क्रेझ कायम होता. आता देखील लोकं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर Ghibli ईमेज शेअर करत आहेत. एवढंच नाही तर आता Ghibli ईमेजसोबतच Ghibli व्हिडीओची क्रेझ देखील वाढली आहे. (फोटो सौजन्य – X)
ज्या Ghibli ईमेजने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला, तो ट्रेंड कोणी सुरु केला आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातील सेटल शहरात राहणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर ग्रँट स्लॅटन हा व्हायरल ट्रेंड घिब्लीचा चेहरा बनला आहे. स्लॅटन कोण आहे आणि त्याने काय केले याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
tremendous alpha right now in sending your wife photos of yall converted to studio ghibli anime pic.twitter.com/FROszdFSfN
— Grant Slatton (@GrantSlatton) March 25, 2025
चॅटजीपीटी निर्माता ओपनएआयने 26 मार्च रोजी त्यांचे नवीन इमेज मेकर टूल 4ओ हे नवीन फीचर सादर केले. हे फीचर रोलआऊट होताच सॉफ्टवेअर इंजिनियर स्लॅटनने या टूल्सचा वापर करून त्यांच्या कुटुंबाची Ghibli ईमेज तयार केली. या फोटोमध्ये स्लॅटन, त्याची पत्नी आणि त्यांचा कुत्रा आहे. हा फोटो त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो इतका व्हायरल झाला की लोकांनी हा ट्रेंडच तयार केला.
सॉफ्टवेअर इंजिनिअरने हा फोटो X प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. त्याने 26 मार्च रोजी हा फोटो शेअर केला आणि काही तासांतच तो फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला. या फोटोने लाखो लोकांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर लोकांनी त्यांच्या Ghibli ईमेज तयार करण्यास सुरुवात केली.
ग्रँट स्लॅटन हे बऱ्याच काळापासून तंत्रज्ञान उद्योगाशी संबंधित आहेत. त्याने प्रत्यक्षात अनेक कंपन्यांसोबत काम केले आहे. त्यांनी अमेझॉन वेब सर्व्हिसमध्ये वरिष्ठ अभियंता या पदावर काम केले आहे. सध्या, ते रो झिरोचे संस्थापक अभियंता आहेत, जिथे ते जगातील सर्वात वेगवान स्प्रेडशीट विकसित करण्यात योगदान देत आहेत. त्याला एआय संशोधनाची सखोल समज आहे.