Tech Tips: स्मार्टफोन सतत गरम का होतो? काय आहेत कारणं आणि सोल्यूशन? टेक एक्सपर्टने काय सांगितलं?
आजच्या डिजीटल काळात स्मार्टफोन म्हमजे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं गॅझेट आहे. दिवसभर आपण स्मार्टफोनचा वापर करत असतो. चॅटिंग, कॉलिंग, फोटोग्राफी, मेसेजिंग, व्हिडीओ, सोशल मीडियचा वापर सर्वांसाठी आपण स्मार्टफोनचा वापर करतो. आपण दिवसभर स्मार्टफोनचा इतका वापर करते की कधी कधी आपला स्मार्टफोन गरम होतो. अशा परिस्थितीत काय करावं, हे आपल्याला सूचत नाही. अनेकजण स्मार्टफोन गरम झाला की काही काळासाठी त्याचा वापर थांबवतात आणि त्यानंतर पुन्हा स्मार्टफोनचा वापर सुरु करतात.
स्मार्टफोन का गरम होतो आणि स्मार्टफोन गरम झाल्यानंतर काय करावं हे अनेकांना माहिती नसतं. यासाठी टेक एक्सपर्टने काही सल्ला दिला आहे. ज्यामुळे युजर्सना समजू शकेल की स्मार्टफोन का गरम होतो आणि युजर्सना त्या चूका टाळण्यासाठी मदत होईल. सर्वात आधी आपण स्मार्टफोन गरम होण्यची कारण जाणून घेऊया (फोटो सौजन्य – Pinterest)
दिर्घकाळासाठी स्मार्टफोनचा वापर करणं – जर तुम्ही तासंतास स्मार्टफोनचा वापर करत असाल, गेम खेळत असाल स्मार्टफोनवर व्हिडीओ बघत असाल तर अशावेळी स्मार्टफोनचा प्रोसेसर सतत काम करत राहतो ज्यामुळे हिट निर्माण होते आणि तुमचा स्मार्टफोन गरम होतो.
बॅकग्राऊंडमध्ये चालणारे अॅप्स: बऱ्याचदा नकळत अनेक अॅप्स बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात ज्यामुळे बॅटरी आणि प्रोसेसर दोन्हीवर भार पडतो. अशा परिस्थितीत तुमचा स्मार्टफोन जास्त गरम होतो.
चार्जिंगदरम्यान स्मार्टफोनचा वापर करणं – जेव्हा तुम्ही स्मार्टफोन चार्जिंगला लावता तेव्हा सहसा त्याचा वापर करणं टाळा. कारण चार्जिंगदरम्यान स्मार्टफोनचा वापर केल्यास बॅटरी आणि स्क्रीन दोन्हीमध्ये हीट निर्माण होते.
लो-क्वालिटी चार्जर किंव केबल: डुप्लीकेट किंवा खराब क्वालिटी वाले चार्जर तुमच्या स्मार्टफोनचा चार्जिंग पॉईंट खराब करू शकतात. अशा चार्जर आणि केबलमुळे जास्त हिट निर्माण होते.
ऊन्हात स्मार्टफोनचा वापर करणं – फोन थेट सूर्यप्रकाशात ठेवल्यास बाह्य उष्णतेचाही डिव्हाइसवर परिणाम होतो.
स्मार्टफोन गरम होणे ही एक सामान्य समस्या आहे परंतु योग्य सवयी आणि काळजी घेतल्यास ती बऱ्याच प्रमाणात टाळता येते. जर तुमचा फोन वारंवार आणि जास्त प्रमाणात गरम होत असेल, तर अधिकृत सेवा केंद्रातून त्याची तपासणी करून घेणे चांगले आहे.