आता जाहिरातींशिवाय गाणी ऐकणं होणार आणखी महाग! Spotify ने वाढवली Premium प्लॅन्सची किंमत, या युजर्सवर होणार परिणाम
गाणी ऐकायची असतील तेव्हा अनेक स्मार्टफोन युजर्स ऑनलाईन म्युझिक प्लॅटफॉर्म Spotify ला प्राधान्य देतात. कारण Spotify वर तुम्ही जुन्या गाण्यांपासून अगदी लेटेस्ट रिलीज करण्यात आलेल्या गाण्यांपर्यंत सर्व गाणी ऐकू शकता. मात्र आता Spotify युजर्ससाठी अत्यंत दु:खाची बातमी आहे. Spotify ने त्यांच्या प्रिमियम सब्सक्रिप्शन प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे आता जाहिरातींशिवाय गाणी ऐकण्यासाठी युजर्सना जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहेत. कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक सुरू ठेवताना वाढत्या खर्चाला तोंड देण्यासाठी ही प्रिमियम सब्सक्रिप्शन प्लॅन्सच्या किंमीतीत वाढ केली आहे.
कंपनीने वाढवलेल्या या किंमतींचा परिणाम दक्षिण एशिया, मध्य पूर्व, अफ्रीका, यूरोप, लैटिन अमेरिका आणि एशिया-प्रशांत क्षेत्रातील युजर्सवर होणार आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, प्रभावित ग्राहकांना पुढील काही आठवड्यांमध्ये किंमतीतील बदल आणि त्यांची प्रभावी तारीख याबद्दल ईमेल पाठवले जातील. त्यामुळे आता गाणी ऐकण्याचा खर्च आणखी वाढवणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
कंपनीने इंडियन यूजर्ससाठी नव्या किंमती आधीपासूनच लागू केल्या आहेत. तसेच Spotify वेबसाइटवर देखील आता प्रीमियम प्लॅन्सच्या अपडेटेड किंमतींबाबत माहिती देण्यात आली आहे. 2019 मध्ये भारतात प्रवेश केल्यानंतर Spotify ने पहिल्यांदाच प्रिमियम सब्सक्रिप्शन प्लॅन्सच्या किंमीतीत वाढ केली आहे.
इंडिविजुअल प्रीमियम प्लॅनची किंमत आता 119 रुपयांवरून 139 रुपये मंथली करण्यात आली आहे. तर दोन अकाऊंटसाठी प्रीमियम एक्सेस देणाऱ्या Duo प्लॅनची किंमत आता 149 रुपयांवरून 179 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याशिवाय स्टूडेंट प्लॅनची किंंमत 59 रुपयांवरून 69 रुपये मंथली करण्यात आली आहे. तर आता फॅमिली प्लॅनची किंमत179 रुपयांवरून 229 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. कंपनीने योजनांमध्ये सर्वात मोठी 28 टक्के वाढ केल्याचे सांगितले जात आहे.
प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केल्यानंतर कंपनीने म्हटलं आहे की, आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मचा विस्तार करत असताना, आजपासून भारतातील नवीन ग्राहकांसाठी आमच्या प्रीमियम किंमती देखील अपडेट करत आहोत. अलिकडच्या काळात अनेक प्लॅटफॉर्म बंद झाल्यामुळे संगीत प्रवाहाचे क्षेत्र देखील लहान होत चालले आहे. असे दिसते की काही म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सनी बाजारपेठ सोडली आहे, ज्यामुळे स्पॉटिफाय आता यूट्यूब म्युझिक, Apple म्युझिक, अमेझॉन म्युझिक, जिओसावन आणि हंगामा सारख्या मोठ्या प्लेयर्ससोबत स्पर्धा करू लागले आहे.
भारतात स्पॉटिफायचे किती अॅक्टिव्ह युजर्स आहेत?
83 मिलीयन
स्पॉटिफायने प्रिमियम प्लॅन्सच्या किंमतीत किती वाढ केली आहे?
28 टक्के
प्रिमियम प्लॅन्सच्या वाढत्या किंमतीचा परिणाम कोणत्या युजर्सवर होणार आहे?
दक्षिण एशिया, मध्य पूर्व, अफ्रीका, यूरोप, लैटिन अमेरिका आणि एशिया-प्रशांत