स्टारलिंकला भारतात मंजूरी देण्यामागचं कारण आलं समोर, खेडेगावातील नागरिकांना होणार फायदा! जाणून घ्या सविस्तर
भारतात आता लवकरच एलन मस्कची सॅटेलाईट इंटरनेट सेवा स्टारलिंक सुरु केली जाणार आहे. यासाठी स्टारलिंकला भारत सरकारकडून मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच एलन मस्कच्या स्पेसएक्स कंपनीची सॅटेलाईट इंटरनेट सेवा स्टारलिंक लवकरच भारतात सुरु होणार आहे. दूरसंचार मंत्रालयाने जारी केलेल्या या परवान्यामुळे आता मस्क भारतात सॅटेलाईट-आधारित ब्रॉडबँड सेवा सुरू करू शकतात. एलन मस्कच्या स्टारलिंकमुळे भारतातील इतर टेलिकॉम कंपन्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सरकारने स्टारलिंकला दिलेल्या परवानगीमुळे भारतीयांना फायदा होणार आहे, यात काही शंकाच नाही. मात्र स्टारलिंकला भारतात नक्की का परवानगी देण्यात आली आहे, यामागील कारण आता जाणून घेऊया.
Nothing Phone 3 बाबत समोर आली नवीन अपडेट, असा असणार स्मार्टफोनचा रियर पॅनल! फोनला मिळणार नवा लूक
स्टारलिंक पारंपरिक फायबर किंवा मोबाईल टॉवरवर अवलंबून नसतं. स्टारलिंक लो अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये उपस्थित असलेल्या हजारो लहान सॅटेलाईटद्वारे ग्राहकांना इंटरनेट सेवा देते. आतापर्यंत 6,000 हून अधिक स्टारलिंक सॅटेलाईट अवकाशात पाठवण्यात आले आहेत. 2027 पर्यंत ही संख्या 42,000 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. याची इंटरनेट स्पीड 50 ते 250 Mbps दरम्यान असू शकते. यामुळे खेडेगावांतील आणि डोंगराळ भागातील नागरिकांना देखील नेटवर्क सेवा मिळणार आहे. एलन मस्कच्या स्टारलिंकमुळे भारतात मोठी क्रांती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
भारत सरकार गेल्या अनेक वर्षांपासून भारतनेट सारख्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहे, ग्रामीण भागात इंटरनेट सेवेचा विस्तार व्हावा, असा या प्रोजेक्ट्सचा उद्दश आहे. भारत सरकारच्या या प्रोडक्ट्सनंतर देखील लडाख, अरुणाचल, जम्मू-कश्मीर, अंदमान सारखे असे अनेक प्रदेश आहेत जिथे नेटवर्क कनेक्टिविटी अत्यंत कमकूवत आहे. पर्वत, जंगले आणि बेटांवर फायबर किंवा टॉवर बसवणे महाग आणि अत्यंत कठीण काम आहे. अशा परिस्थितीत एलन मस्कने सुरु केलेली स्टारलिंक सेवा अशा प्रदेशांमध्ये नेटवर्क कनेक्टिविटीचा विस्तार करण्यासाठी अत्यंत फायद्याची ठरू शकते. आपत्कालीन सेवा, सीमेवर पाळत ठेवणे, टेलिमेडिसिन, ऑनलाइन शिक्षण आणि ई-गव्हर्नन्स सारख्या सुविधांमध्ये स्टारलिंक महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
स्टारलिंकचा खरा परिणाम खेडेगावातील लोकांवर होणार आहे. ज्या ठिकाणी वर्षानुवर्षे नेटवर्कचा वापर करण्यात अडचणी येत आहेत, अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांवर स्टारलिंकचा मोठा परिणाम होणार आहे. त्यांचं जीवन पूर्णपणे बदलणार आहे. टेलीमेडिसिन, डिजिटल शिक्षा, सरकारी योजनांची माहिती आणि ऑनलाइन बँकिंग सारख्या सेवांचा फायदा आता खेडेगावातील लोकांना देखील होणार आहे.
स्मार्टफोन खरेदी करताना तुम्हीही IP रेटिंग तपासता? यातील अंकाचा खरा अर्थ माहिती आहे का? जाणून घ्या
पब्लिक-प्राइवेट पार्टनरशिप मॉडेल अंतर्गत अनुदान देऊन गावकऱ्यांना परवडणाऱ्या दरात स्टारलिंक उपलब्ध करून देण्याचा सरकार विचार करत आहे. स्टारलिंकच्या भारतातील एंट्रीमुळे अनेकांचे जीवन बदलणार आहे. खेडेगावातील आणि डोंगराळ भागातील लोकांना नेटवर्कचा वापर करता येणार आहे.