
2 स्मार्टफोनपैकी 1 स्मार्टफोनमध्ये असतो 50MP रिझोल्युशन कॅमेरा, यामागचे कारण काय?
कोणालाही विचारलं की स्मार्टफोन्सचा कॅमेरा की DSLR? तर 70 ते 80 टक्के लोकांचे उत्तर स्मार्टफोनचा कॅमेरा असच असतं. DSLR मधून सर्वात चांगले फोटो येतात यामध्ये काहीच शंका नाही. पण आपण रोज आपल्या सोबत DSLR घेऊन फिरू शकत नाही. तर दुसरीकडे आपला स्मार्टफोन कायम आपल्या सोबत असतो. त्यामुळे आपण कधीही आपल्या स्मार्टफोनमधून फोटो क्लिक करू शकतो. शिवाय स्मार्टफोन्समध्ये लेन्स ऍडजस्ट करण्याची सुधा गरज भासत नाही. त्यामुळे अनेक युजर्स दले पेक्षा स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याला अधिक पसंती देतात.
हेदेखील वाचा- स्मार्टफोमसाठी थर्ड पार्टी ॲप्स ठरतात धोकादायक! ॲप्स डाउनलोड करताना या गोष्टी लक्षात ठेवा
ग्राहकांची पसंती आणि गरजा लक्षात घेत स्मार्टफोन निर्माता कंपन्या देखील स्मार्टफोनमधील कॅमेरा अधिक चांगला होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सध्या लाँच होत असलेल्या अनेक स्मार्टफोनमध्ये 50Mp कॅमेरा दिला जातो. तुम्ही पाहिलं असेल की, 2 स्मार्टफोनपैकी 1 स्मार्टफोनमध्ये 50MP रिझोल्युशन कॅमेरा असतो. मग यामागाच नक्की कारण तरी काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. आज तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आम्ही देणार आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)
स्मार्टफोन खरेदी करताना बहुतांश लोक कॅमेऱ्याला प्राधान्य देतात. प्रत्येकाला अधिक मेगापिक्सेल कॅमेरा असलेला स्मार्टफोन हवा असतो. वापरकर्त्यांची ही निवड लक्षात घेऊन कंपन्याही गुणवत्तेऐवजी मेगापिक्सल वाढवण्यावर भर देत आहेत. आजकाल 200MP पर्यंतचे कॅमेरा असलेले स्मार्टफोन उपलब्ध आहेत. ज्या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेल कॅमेरा आहे त्यांना बाजारात खूप मागणी आहे.
एका अहवालानुसार, या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत शिप केलेल्या 50 टक्क्यांहून अधिक स्मार्टफोनमध्ये 50MP रिझोल्यूशन असलेले कॅमेरे होते. स्मार्टफोन खरेदी करताना ग्राहक कॅमेऱ्यातील मेगापिक्सेलच्या संख्येकडे विशेष लक्ष देत असतात. 2020 मध्ये स्मार्टफोनचे सरासरी प्राथमिक कॅमेरा रिझोल्यूशन 27MP होते, परंतु ते आता जवळजवळ दुप्पट झाले आहे.
हेदेखील वाचा- iPhone 16 Pro म्हणजे फक्त वेळेचा अपव्यय! टेक एक्झिक्युटिव्ह आदित्य अग्रवालचं वक्तव्य चर्चेत
प्रत्येक दोन स्मार्टफोनपैकी एका स्मार्टफोनमध्ये 50MP सेन्सर दिले जात आहे. याशिवाय कॅमेऱ्यांच्या संख्येमुळेही ग्राहक आकर्षित होत आहेत. काउंटरपॉईंट रिसर्चनुसार, मागील कॅमेऱ्यांची संख्या देखील काही वर्षांमध्ये बदलली आहे. आजकाल, प्रत्येकी तीन कॅमेरे मागील बाजूस दिसतात. स्मार्टफोनच्या मागील पनलवर ट्रिपल कॅमेरा असणं ही लोकांची पसंती झाली आहे. 2024 मध्ये, ट्रिपल कॅमेरा सेटअप असलेले फोन अधिक विकले गेले. 2024 मध्ये त्यांची विक्री 45 टक्के होती.
अलीकडच्या काळात, 108MP कॅमेरा देखील वापरकर्त्यांची पसंती म्हणून उदयास आला आहे. मध्यम किंमत विभागामध्ये 108MP आणि 100MP सारख्या उच्च रिझोल्यूशन कॅमेऱ्यांचा अवलंब करण्यामध्ये सातत्याने वाढ झाली आहे. एंट्री-टू-मिड-प्राईस सेगमेंटमध्ये, चीनी कंपन्यांनी ग्राहकांच्या पसंती लक्षात ठेवल्या आहेत आणि कमी किमतीत 50MP आणि 108MP कॅमेरे ऑफर केले आहेत.