एकट्यात महिला कोणत्या अॅप्सचा वापर करतात? वाचून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का
सध्याच्या डिजीटल काळात स्मार्टफोन आपल्या कामाचं साधन नाही तर आपली गरज बनलं आहे. आपण आपल्या स्मार्टफोनसोबत इतके जोडलेले आहोत की आपला स्मार्टफोन आपल्या डोळ्यांसमोर नसेल की किंवा तो हातातून खाली पडला, तर आपण अस्वस्थ होतो. काय करावं हेच आपल्याला सूचत नाही. जर मुली किंवा महिलांविषयी बोलायचं झालं तर मुली किंवा महिला त्यांच्या स्मार्टफोनसोबत अधिक कनेक्टेड असतात. मैत्रिणींना मेसेज करण्यापासून भाजीची रेसिपी जाणून घेईपर्यंत मुली त्यांच्या अनेक कामांसाठी स्मार्टफोनचा वापर करत असतात.
मुलींच्या स्मार्टफोनमध्ये तुम्ही सहसा शॉपिंग, मेकअप, फोटो एडीटर असे अॅप्स पाहिले असतील. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की, मुली शॉपिंग, मेकअप, फोटोचे अॅप्स मोठ्या प्रमाणात वापरतात. पण मुली एकट्या असताना कोणत्या अॅप्सचा सर्वात जास्त वापर करतात तुम्हाला माहिती आहे का? खरं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का देणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सध्याच्या धावपळीच्या जिवनात मानसिक शांती प्रत्येकाची गरज बनली आहे. यासाठीच मुली कॉल्म, हेडस्पेस किंवा इनसाइट टाइमर यांसारख्या अॅप्सचा वापर करतात. या अॅप्समुळे टेंशन कमी होण्यासाठी मदत होते आणि मुलींना मानसिक शांतीचा अनुभव मिळतो.
स्पॉटिफाई, गाना आणि ऑडिबल सारख्या प्लेटफॉर्म मुलींच्या फेवरेट अॅप्स लीस्टमध्ये सहभागी आहेत. एकटे असताना म्यूजिक आणि पॉडकास्ट ऐकणं, केवळ एंटरटेनमेंटचं माध्यम नाही तर स्वत:ला वेळ देण्याची एक पद्धत आहे.
सोशल मीडिया म्हणजे सध्याच्या तरूण पिढीसाठी स्मार्टफोनमधील सर्वात महत्त्वाचं अॅप. सोशल मीडिया तर प्रत्येकजण वापरतो पण मुली सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधील कोणते अॅप्स वापरतात माहिती आहे का? मुली एकट्यात असताना Pinterest, Instagram Reels आणि यूट्यूब शॉर्ट्स सरारख्या प्लेटफॉर्म्सचा अधिक वापर करतात. क्रिएटिव कंटेंट, DIY व्हिडीए, फूड रेसिपीज किंवा ट्रैवल व्लॉग्स पाहण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो.
लर्निंग अॅप्सवर मुली त्यांचा अधिक वेळ घालवतात. मुलींना कोर्सेरा, ड्युओलिंगो आणि स्किलशेअर सारख्या लर्निंग अॅप्सवर नवीन गोष्टी शिकायला आवडतात.
मुली केवळ Nykaa, Myntra, Amazon सारख्या ई-कॉमर्स अॅप्सवरून खरेदी करत नाहीत तर प्रोडक्ट्सची तुलना करणे, रिव्यू वाचणे आणि ट्रेंडिंग फॅशन एक्सप्लोर करणे देखील पसंत करतात. त्यांच्या आवडत्या वस्तू विषलिस्टमध्ये जोडतात.
मुलींचा स्मार्टफोन वापर फक्त चॅटिंग किंवा सोशल मीडियापुरता मर्यादित नाही. ती स्वतःची काळजी घेण्यासाठी, आवडींसाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करते.