आयफोन 15 घेण्याचा विचार करताय? मग फ्लिपकार्ट दिवाळी सेल आहे ना! भरघोस डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी
Flipkart चा Big Diwali Sale सुरू झाला आहे. सेलमध्ये तुम्हाला प्रत्येक खरेदीवर विशेष ऑफर मिळणार आहे. तसेच या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन्स देखील कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये iPhone 15 चे 128 GB व्हेरिएंट खरेदी करणाऱ्यांना सुवर्ण संधी आहे. येथे बँक आणि एक्सचेंज ऑफरनंतर आयफोन 15 ची किंमत 50,000 रुपयांपेक्षा कमी होते. iPhone 15 मध्ये पॉवर्फुल परफॉर्मन्स आणि चांगला डिस्प्ले आहे. याशिवाय, यात मॅगसेफ चार्जिंगसाठी देखील सपोर्ट आहे.
हेदेखील वाचा- सॅमसंग घेऊन येतोय AI फीचर्ससह नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन, कधी होणार लाँच? वाचा सविस्तर
तुम्ही तुमच्या अँड्रॉइड किंवा जुन्या आयफोनवरून नवीन वर्जनवर अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर एक आकर्षक डील उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर सुरू झालेल्या ‘बिग दिवाळी सेल’मध्ये स्वस्त दरात iPhone 15 खरेदी करण्याची संधी मिळत आहे. दिवाळी सेलमध्ये, iPhone 15 सामान्य किमतीपेक्षा खूपच कमी किमतीत उपलब्ध असेल. बँक ऑफर आणि एक्सचेंज डील एकत्र केल्यास त्याची किंमत 50,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. (फोटो सौजन्य – pinterest)
Flipkart निवडक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर बँक सवलत देत आहे, जे काही हजार रुपयांची सूट देऊ शकते. याशिवाय, जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल तर तुम्ही तो एक्सचेंज बोनससाठी एक्सचेंज करू शकता. या ऑफरसह, 66,900 रुपयांच्या iPhone 15 ची किंमत 50,000 रुपयांपेक्षा कमी होणार आहे. अशा प्रकारे बघितले तर या डीलमध्ये तुमची हजारो रुपयांची बचत होत आहे.
iPhone 15 मध्ये A16 बायोनिक चिप आहे, जी गेमिंग आणि मल्टीटास्किंग सहज हॅण्डल करू शकते. यात 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे, जो वाइब्रेंट रंग आणि शार्प व्हिज्युअल ऑफर करतो. फोटोग्राफीसाठी, यात 48MP प्रायमरी कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. हे कॉम्बिनेशन तुम्हाला कमी प्रकाशातही चांगले फोटो क्लिक करण्यास अनुमती देते. यात अल्ट्रा-वाइड लेन्स देखील आहे जे लँडस्केप किंवा ग्रुप शॉट्ससाठी उत्तम आहे. सेल्फी प्रेमींसाठी, iPhone 15 मध्ये 12MP सेन्सर आहे. iPhone 15 हा 5G ला सपोर्ट करतो. यात मॅगसेफ चार्जिंग सपोर्ट देखील आहे.
हेदेखील वाचा- iPhone 16 Review: आयफोन 16 खरेदी करण्याचा विचार करयात? पण रिव्ह्यु वाचले का?
जर तुम्हाला 50,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर, iPhone 15 ही एक चांगली डील आहे. विशेषत: Apple च्या नेहमीच्या किंमतींचा विचार करता, तुम्हाला आयफोन 15 कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. ज्यांना त्यांचा जुना फोन मजबूत डिस्प्ले आणि दमदार परफॉर्मन्ससह अपग्रेड करायचा आहे त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम डील आहे.
बिग बिलियन डेज सेल संपल्यानंतर, आजपासून फ्लिपकार्टची आणखी एक सेल लाईव्ह होणार आहे. बिग दिवाळी सेलमध्ये केवळ आयफोनच सवलतीत उपलब्ध नसतील. किंबहुना, इतर ब्रँडचे स्मार्टफोन आणि इतर प्रोडक्ट्स देखील येथून स्वस्त दरात खरेदी करता येतात.