सॅमसंग घेऊन येतोय AI फीचर्ससह नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन, कधी होणार लाँच? वाचा सविस्तर
सॅमसंग नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सॅमसंगच्या नवीन स्मार्टफोनची म्हणजेच Samsung Galaxy S25 Ultra ची चर्चा सुरु आहे. Samsung Galaxy S25 Ultra पुढील वर्षी जानेवारीमध्ये लाँच होऊ शकतो. कंपनी यामध्ये अनेक अपग्रेड आणि AI फीचर्सचा समावेश करणार आहे. लाँचपूर्वी या नवीन फोनचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. Samsung Galaxy S25 Ultra च्या ग्लोबल व्हेरियंटमध्ये क्वालकॉमचा चिपसेट दिली जाणार आहे. तर युरोपियन देशांमध्ये लाँच करताना फोनमध्ये Exynos 2500 चिपसेट असेल.
हेदेखील वाचा- iPhone 16 Review: आयफोन 16 खरेदी करण्याचा विचार करयात? पण रिव्ह्यु वाचले का?
सॅमसंग त्याच्या फ्लॅगशिप Samsung Galaxy S25 सिरीजवर काम करत आहे. या सीरिजमध्ये Samsung Galaxy S25 Ultra देखील लाँच केला जाईल. लाँच होण्यापूर्वीच याबाबतची सर्व माहिती समोर आली आहे. Galaxy S24 Ultra च्या तुलनेत यात अनेक अपग्रेड फीचर्स दिले जातील. याशिवाय, ही सिरीज AI वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असेल. (फोटो सौजन्य – X)
Galaxy S25 Ultra मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.8-इंचाचा डायनॅमिक AMOLED डिस्प्ले असू शकतो. फोनची डिझाईन पूर्वीपेक्षा अधिक सडपातळ आणि हलकी असेल. डिझाईनच्या बाबतीत आणखी अनेक गोष्टी बदलू शकतात.
Samsung Galaxy S25 Ultra मध्ये प्रगत ऑप्टिकल झूम आणि स्टेबलाइजेशन वैशिष्ट्यांसह 200MP प्रायमरी कॅमेरा असेल. कॅमेरामध्ये AI वैशिष्ट्ये देखील उपलब्ध असतील, ज्यामुळे फोटोग्राफीचा अनुभव सुधारेल. यामधील AI प्रोसेसिंग कमी प्रकाशातही चांगले फोटो काढण्यास मदत करेल. कम्प्युटेशनल फोटोग्राफी आणि ॲडव्हान्स पोर्ट्रेट मोड या नवीन वैशिष्ट्यांचा यामध्ये समावेश केला जाऊ शकतो. यावेळी कंपनी ऑप्टिकल झूम देखील वाढवणार आहे. सेल्फी कॅमेरा Galaxy S24 Ultra सारखाच असू शकतो, परंतु यामध्ये प्रगत फीचर्सचा समावेश असेल.
हेदेखील वाचा- तुम्हाला ब्लॉग आणि व्लॉगमधील फरक माहीत आहे का? कोण आहे बेस्ट? जाणून घ्या
Galaxy S25 Ultra मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 4 प्रोसेसर असेल, ज्यामध्ये 16GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेज पर्याय असतील. तथापि, युरोपियन देशांमध्ये, सॅमसंग आपला फ्लॅगशिप किलर फोन इनहाउस Exynos 2500 चिपसेटसह लाँच करणार आहे. यामध्ये देखील स्टोरेज पर्याय समान असू शकतात.
Galaxy S25 Ultra मध्ये 5500mAh बॅटरी असेल, जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. याशिवाय, यात 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील असेल. Galaxy S25 Ultra मध्ये Samsung च्या One UI 6.0 इंटरफेससह Android 14 ऑपरेटिंग सिस्टम असेल.
Galaxy S25 Ultra ची किंमत सुमारे 1,20,000 रुपयांपासून सुरू होऊ शकते. त्याची लाँचिंग तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नाही, परंतु ही सिरीज जानेवारी 2025 मध्ये लाँच होईल अशी अपेक्षा आहे.