OnePlus 12 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज
तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याचा किंवा तुमचा जुना फोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. OnePlus 12 5G स्मार्टफोन तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही OnePlus 12 5G स्मार्टफोन Amazon India वर डिस्काउंटसह अतिशय स्वस्तात खरेदी करू शकता. याफोनमध्ये तुम्हाला अनेक नवीन फीचर्स देखील मिळणार आहेत.
हेदेखील वाचा- iOS 18.2 Update: बॅटरी हेल्थ ट्रॅक करण्यासाठी iPhone युजर्सना मिळणार नवीन फीचर, कधी होणार रिलीज?
वनप्लसचा OnePlus 12 5G हा प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन गेल्या वर्षी लाँच झाला होता. सध्या या स्मार्टफोनवर डिस्काउंटसोबतच बँक ऑफर्स आणि एक्सचेंज बोनस सारख्या उत्तम ऑफर्स उपलब्ध आहेत. OnePlus चा हा स्मार्टफोन 50 मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरा आणि क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर यांसारख्या अनेक शक्तिशाली वैशिष्ट्यांसह येतो. येथे आम्ही तुम्हाला OnePlus स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या अप्रतिम डीलबद्दल माहिती देणार आहोत. (फोटो सौजन्य- pinterest)
OnePlus 12 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.82-इंचाचा QHD+ LTPO ProXDR डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामुळे फोनला प्रिमियम लुक मिळतो. त्याची कमाल ब्राईटनेस 4500 nits आहे.
OnePlus 12 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये प्रायमरी कॅमेरा 50MP आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह Sony LYT-808 सेन्सरने सुसज्ज आहे. यासोबत 48 MP चा अल्ट्रा वाइड अँगल देण्यात आला आहे. या फोनमध्ये 64MP टेलिफोटो कॅमेरा आहे, जो 3x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करतो. OnePlus च्या या फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे.
OnePlus 12 स्मार्टफोन 12GB आणि 16GB रॅम पर्यायांसह 256GB आणि 512GB स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
हेदेखील वाचा- Laptop Tips: लॅपटॉपच्या बॅटरी लाईफ समस्येने हैराण झालात? या टीप्स करतील मदत
OnePlus 12 स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 8 Gen 3 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन Android 14 वर आधारित OxygenOS वर चालतो. फोनमध्ये डेटा ट्रान्सफर आणि चार्जिंगसाठी USB टाइप C पोर्ट आहे.
OnePlus च्या या फोनमध्ये 5400 mAh ची बॅटरी आहे. यासोबतच, फोन 80W SUPERVOOC वायर्ड चार्जिंगसह 50W AIRVOOC वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो.
OnePlus 12 स्मार्टफोनचा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 64,999 रुपयांच्या किंमतीला लिस्ट झाला आहे. हा स्मार्टफोन Amazon वर मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करता येईल. या OnePlus स्मार्टफोनवर Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्डवर 3,249 रुपयांचे डिस्काऊंट मिळत आहे. यानंतर फोनची किंमत 61,750 रुपये कमी होते. यासोबतच हा OnePlus स्मार्टफोन जुन्या स्मार्टफोनच्या एक्सचेंज ऑफरसह आणखी स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. एक्सचेंज डिस्काउंट तुम्ही एक्सचेंज करत असलेल्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.