Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jawa Yezdi ची ‘ही’ लोकप्रिय बाईक आता Amazon आणि Flipkart वर उपलब्ध

Jawa Yezdi च्या बाईक्स खासकरून त्यांच्या दमदार परफॉर्मन्स आणि डिझाइनसाठी ओळखल्या जातात. आता Yezdi Adventure आणि Roadster ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध असणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 05, 2026 | 07:06 PM
Jawa Yezdi ची 'ही' लोकप्रिय बाईक आता Amazon आणि Flipkart वर उपलब्ध

Jawa Yezdi ची 'ही' लोकप्रिय बाईक आता Amazon आणि Flipkart वर उपलब्ध

Follow Us
Close
Follow Us:
  • Jawa Yezdi च्या बाईक्सना भारतात चांगली मागणी
  • Yezdi Adventure आणि Roadster ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध
  • ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध बाईक
जावा येझ्दी मोटरसायकल्सने आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या 2025 Yezdi Adventure आणि 2025 Yezdi Roadster या बाईक्स आता Amazon आणि Flipkart या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिल्या आहेत. आतापर्यंत फक्त शोरूमपुरती मर्यादित असलेल्या या मॉडेल्स आता देशभरातील ग्राहकांसाठी अवघ्या एका क्लिकवर बुक करता येणार आहेत.

सणासुदीच्या काळात मागील वर्षी विक्रीचे विक्रम नोंदवणाऱ्या या लोकप्रिय बाईक्सना आता ऑनलाइन माध्यमातून अधिक व्यापक पोहोच मिळणार आहे. यामुळे क्लासिक दमदार रायडींगवर प्रेम करणाऱ्या रायडर्ससाठी खरेदी प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Nissan Tekton लाँच होण्यापूर्वी सोशल मीडियावर नवी टिझर झाला रिलीज, मिळाली ‘ही’ माहिती

डिजिटल वितरण नेटवर्क अधिक मजबूत

जावा येझ्दी मोटरसायकल्सने आपल्या यशस्वी ऑनलाइन पदार्पणानंतर डिजिटल वितरण क्षमता अधिक मजबूत केली आहे. Flipkart वर प्रीमियम क्लासिक मोटरसायकल्स सूचीबद्ध करणारी जावा येझ्दी ही पहिली कंपनी ठरली होती. त्यानंतर Amazon वरही ही सेवा सुरू करण्यात आली. कंपनीचे ऑनलाइन मॉडेल हे डीलर-आधारित असून, यामुळे ग्राहकांना ऑनलाइन बुकिंगनंतर स्थानिक डीलरकडून संपूर्ण ऑन-रोड प्रक्रिया पूर्ण करता येते.

कंपनी काय म्हणते?

जावा येझ्दी मोटरसायकल्सचे सह-संस्थापक अनुपम थरेजा म्हणाले, “Amazon आणि Flipkart वर 2025 Yezdi Adventure आणि Roadster उपलब्ध करून दिल्यामुळे देशभरातील रायडर्सना क्लासिक मोटरसायकलिंगचा अनुभव अधिक सहज घेता येणार आहे. या बाइक्सना शोरूममध्ये मिळालेला प्रतिसाद हा परंपरा आणि आधुनिक अभियांत्रिकी यांचा मिलाफ किती लोकप्रिय आहे, याचे प्रतीक आहे.”

High Security Number Plate अजूनही बसवली नाही? ‘या’ शहरात कारवाईला सुरुवात; दंड टाळण्यासाठी काय करावे?

ऑनलाइन खरेदी प्रक्रिया कशी असेल?

ग्राहक Amazon किंवा Flipkart वर एक्स-शोरूम बुकिंग रक्कम भरू शकतात. त्यानंतर स्थानिक अधिकृत डीलर ऑर्डरची पुष्टी करून उर्वरित ऑन-रोड पेमेंट, नोंदणी आणि विम्याची प्रक्रिया पूर्ण करतो. ॲक्सेसरीज आणि ॲड-ऑन्सची खरेदी डीलरशिपवर केली जाईल.

खास ऑफर्स

Amazon वर ग्राहकांना 6,500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक, Prime मेंबर्ससाठी 5% कॅशबॅक आणि 6 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI चा लाभ मिळणार आहे. तर Flipkart वर ₹10,000 पर्यंत बँक ऑफर्स आणि ₹4,000 पर्यंत क्रेडिट कार्ड कॅशबॅक देण्यात येणार आहे.

कोणते मॉडेल्स उपलब्ध?

2025 Yezdi Adventure आणि 2025 Yezdi Roadster व्यतिरिक्त Jawa 350, Jawa 42, 42 FJ, 42 Bobber आणि Perak ही संपूर्ण जावा रेंजही या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. सध्या ही सेवा देशातील 44 शहरांमध्ये 55 अधिकृत डीलर्समार्फत सुरू असून, महाराष्ट्रात पुण्यासह अनेक प्रमुख शहरांचा त्यात समावेश आहे.

Web Title: Jawa yezdi adventure and roadster bikes are available on amazon and flipkart

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 07:06 PM

Topics:  

  • amazon
  • auto news
  • automobile

संबंधित बातम्या

Nissan Tekton लाँच होण्यापूर्वी सोशल मीडियावर नवी टिझर झाला रिलीज, मिळाली ‘ही’ माहिती
1

Nissan Tekton लाँच होण्यापूर्वी सोशल मीडियावर नवी टिझर झाला रिलीज, मिळाली ‘ही’ माहिती

2025 मध्ये ‘ही’ Electric Car बनली ईव्ही मार्केटची बादशाह! मध्यम वर्गीय ग्राहकांनी भरभरून दिलं प्रेम
2

2025 मध्ये ‘ही’ Electric Car बनली ईव्ही मार्केटची बादशाह! मध्यम वर्गीय ग्राहकांनी भरभरून दिलं प्रेम

‘या’ ऑटोमॅटिक कारसाठी फक्त 2 लाख रुपये भरा आणि थेट घरपोच डिलिव्हरी मिळवा! जाणून घ्या EMI चे गणित
3

‘या’ ऑटोमॅटिक कारसाठी फक्त 2 लाख रुपये भरा आणि थेट घरपोच डिलिव्हरी मिळवा! जाणून घ्या EMI चे गणित

Maruti Brezza 2026 खरेदी करण्यासाठी तुमचा पगार किती असावा? जाणून घ्या On Road Price
4

Maruti Brezza 2026 खरेदी करण्यासाठी तुमचा पगार किती असावा? जाणून घ्या On Road Price

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.