
नवी दिल्ली : सध्या इंटरनेटचा वापर (Use of Internet) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात युट्यूब (YouTube) पाहणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. युट्यूबकडूनही आपल्या युजर्ससाठी अनेक फिचर्स (YouTube Features) आणले जात आहेत. युट्यूबवरून अनेक व्हिडिओ आपल्याला अगदी सहज मिळू शकतात. त्यामुळे व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. पण हे व्हिडिओ पाहत असताना आपल्याला अनेक जाहिराती (YouTube Ads) ऐनवेळी येत असतात. त्यामुळे मूड ऑफ (Mood Off) होतो. पण अशा काही ट्रिक्स आहेत ज्या फॉलो केल्याने जाहिराती बंद होतील.
Skip चा पर्याय
युट्यूब व्हिडिओ पाहताना अनेकदा मोठ्या प्रमाणात जाहिराती येतात. त्यामुळे यापासून सुटका मिळवण्यासाठी आपण लगेचच जाहिराती Skip करतो. पण आता हा पर्याय देखील अनेक व्हिडिओंमध्ये जाहिरात संपल्यानंतर येतो.
Extensions किंवा थर्ड पार्टी ऍपचा वापर
युट्यूबवरील जाहिराती बंद करण्यासाठी तुम्हाला एक्सटेन्शन, थर्ड पार्टी ऍप किंवा इतर अधिकृत पद्धतीचा वापर करता येऊ शकतो.
जाहिराती अशा करा ब्लॉक
व्हिडिओ जाहिरात फ्री पाहण्यासाठी प्रयत्न असतो. एकतर वेब ब्राऊजरच्या माध्यमातून तर दुसरा एक्सटेन्शन यूज करून ऍड ब्लॉक करता येऊ शकतात. Adblock For YouTube या एक्सटेन्शनचा वापर करता येऊ शकतो.
ब्राऊझर डाऊनलोड करावा
याप्रकारे तुम्ही Free Adblocker Browser ही डाऊनलोड करू शकता. त्यावर तुम्हाला जाहिराती दिसणार नाहीत.
प्रीमियम प्लॅन बेस्ट
तिसरा आणि बेस्ट पर्याय म्हणजे YouTube Premium सबस्क्रिप्शन खरेदी करायला हवे. यावर तुम्हाला फक्त ऍडपासून सुटका मिळत नाही तर इतर अनेक सुविधा मिळते.
129 रुपयांपासून प्लॅन सुरु
YouTube Premium चा प्लॅन 129 रूपयांत सुरु होतो. यात ऍड फ्री अनुभव मिळतो. यातून YouTube Music ही एक्सेस करता येऊ शकते. यातील अनेक सर्व्हिस फ्री असतात. तर फोन खरेदी केल्यानंतर या ऑफरचा फायदा मोफत घेता येऊ शकतो.