ओ माय गॉड! आता iPhone आणि iPad चालवण्यासाठी हातांची गरज नाही, मेंदू कंट्रोल करणार अॅक्टिव्हिटी! लवकरच येणार नवी टेक्नोलॉजी
iPhone चा 20 वर्धापनदिन 2027 मध्ये साजरा केला जाणार आहे. या ईव्हेंटला अजून 2 वर्षे शिल्लक असली तरी याची तयारी आतापासूनच सुरु झाली आहे. या ईव्हेंटमध्ये कोणते नवीन गॅझेट्स लाँच केले जाणार आहेत, याची तयारी आता सुरु झाली आहे. शिवाय या गॅझेट्सची चाचणी देखील सुरु करण्यात आली आहे. असं सांगितलं जात आहे की, 2027 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या ईव्हेंटमध्ये कंपनी फोल्डेबल iPhone, AI-सपोर्टेड स्मार्ट ग्लासेस, AirPods आणि नवीन Apple Watch असे काही गॅझेट्स लाँच करणार आहे.
2027 मध्ये लाँच केल्या जाणाऱ्या गॅझेट्सची चर्चा सुरु असतानाच आता या ईव्हेंटबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनी या ईव्हेंटमध्ये एक नवीन टेक्नोलॉजी लाँच करणार आहे. ही टेक्नोलॉजी अतिशय खास असणार आहे. कारण या टेक्नोलॉजीच्या मदतीने लोकं त्यांच्या मेंदूच्या साहाय्याने आयफोन आणि आयपॅड कंट्रोल करू शकणार आहेत. कंपनी आता केवळ आगामी आयफोन फक्त आयपॅड किंवा व्हिजन प्रो 2.0 नाही, तर अशा तंत्रज्ञानावरही काम करत आहे जी तंत्रज्ञानाच्या जगात मोठा बदल घडवून आणू शकते. (फोटो सौजन्य: Pinterest)
खरं तर कंपनी अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे की जे यूजर्सना त्यांचे आयफोन आणि आयपॅड मेंदूच्या साहाय्याने कंट्रोल करण्याची सुविधा देणार आहे. या टेक्नोलॉजीच्या मदतीने गंभीर शारीरिक विकलांग लोकंही अगदी सहजपणे आयफोन आणि आयपॅडचा वापर करू शकणार आहेत. यासाठी त्यांना आयफोन किंवा आयपॅडला हात लावण्याची देखील गरज भासणार नाही.
द वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टनुसार, Apple सिंक्रोन नावाच्या कंपनीसोबत काम करत आहे. कंपनीचा हा निर्णय ब्रेन कंप्यूटर इंटरफेस क्षेत्रातील पहिलं पाऊल आहे. एलन मस्कच्या न्यूरालिंक प्रमाणेच पण काही वेगळ्या पद्धतीने अॅपल एक नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याच्या प्रयत्नात आहे. एलन मस्कच्या न्यूरालिंकसोबत स्पर्धा करण्यासाठी अॅपलला अजून बराच मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. अॅपल आधीच अनेक हियरिंग टूल्स ऑफर करते, जी पहिल्यांदा 2014 मध्ये सादर केली गेली.
हार्डवेयर आणि सॉफ्टवेयरचा योग्य वापर करत कंपनी एक नवीन तंत्रज्ञात विकसित करत आहे. आता कंपनी मेंदूच्या सिग्नलचे स्पष्टीकरण देणारी सिस्टम विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. ही सिस्टम iPhone आणि iPad सारख्या डिव्हाईससोबत जोडली जाणार आहे. सिंक्रोनने स्टेंट्रोड नावाचा एक छोटा इम्प्लांट डिजाइन केला आहे. जे यूजर्सच्या मेंदूच्या मोटर कॉर्टेक्सजवळील शिरामध्ये ट्रांसप्लांट केले जाईल. यानंतर सिस्टम मेंदूतून विद्युत सिग्नलचे स्पष्टिकरण देऊ शकतो. त्या संकेतांचे रूपांतर स्क्रीनवरील आयकॉन निवडण्यासारख्या कृतींमध्ये केले जाऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला अशा भविष्याकडे नेले जाऊ शकते जिथे यूजर्स फक्त त्यांच्या विचारांनी आयफोन, आयपॅड आणि अगदी व्हिजन प्रो हेडसेट नियंत्रित करू शकतात.