Google IO 2025: लवकरच सुरु होणार आहे गूगलचा Grand Event! अँड्रॉईड 16 सह आणखी काय असणार खास, जाणून घ्या
दरवर्षीप्रमाणे यंदाही टेक जायंट कंपनी गुगलचा मेगा ईव्हेंट Google I/O आयोजित केला जाणार आहे. Google I/O 2025 हा ईव्हेंट 20 मे पासून सुरु होणार आहे. या ईव्हेंटमध्ये अनेक सॉफ्टवेयर अपडेट्स जगासमोर सादर केले जाणार आहेत. शिवाय टेक्नोलॉजी क्षेत्रातील नवीन कल्पना देखील या ईव्हेंटच्या माध्यमातून सादर केल्या जाणार आहेत. गुगलने आधीच स्पष्ट केलं आहे की, या ईव्हेंटचा संपूर्ण फोकस Android, AI, Web आणि Cloud वर असणार आहे.
Android 16 आणि Gemini AI सह जोडलेल्या नवीन वैशिष्ट्यांची घोषणा या ईव्हेंटमध्ये केली जाणार आहे. हा एक ऑनलाईन ईव्हेंट असणार आहे, ज्यामध्ये सर्वजण सहभागी होऊ शकतात. या ईव्हेंटमध्ये लाइव स्ट्रीम करण्यात आलेले कीनोट आणि सेशन यांचा देखील समावेश असणार आहे. यासोबतच, गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही शोरलाइन एंफिथिएटर, कॅलिफोर्नियामध्ये एक फिजिकल ईव्हेंटचं आयोजन केलं जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये Android 16, Gemini आणि AI अपडेट्स आणि Android XR हे प्रमुख अपडेट्स सादर केले जाणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Android 16 बाबत गेल्या अनेक आठवड्यांपासून चर्चा सुरु आहे. आशा आहे की, हे अपडेट आगामी ईव्हेंटमध्ये सादर केलं जाऊ शकतं. म्हणजेच Android 16 च्या फीचर्सवरून पडदा आता अखेर उठणार आहे. असं सांगितलं जात की, नवीन यूजर इंटरफेस आणि री-डिजाइन्ड वॉल्यूम कंट्रोलशिवाय अधिक चांगले एक्सेसिबिलिटी फीचर्स दिले जाणार आहेत. याशिवाय सिक्योरिटीसाठी एक नवीन मोड दिला जाणार आहे. ज्यामुळे डिव्हाईसची सिक्योरिटी सेटिंग्स अधिक मजबूत होणार आहे. यामध्ये Health Connect 2.0 देखील मिळेल.
AI बाबत केल्या जाणाऱ्या घोषणांकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. जेमिनी मॉडेल, गुगल एआय स्टुडिओ आणि नोटबुकएलएम हे आय/ओ होमपेजवर हायलाइट केले आहेत. जेमिनी अल्ट्राची अपग्रेडेड आवृत्ती या ईव्हेंटमध्ये सादर केली जाण्याची शक्यता आहे. नवीन जेमिनी सबस्क्रिप्शन स्कीमची घोषणा होऊ शकते.
गुगल आणि सॅमसंग संयुक्तपणे Android XR नावाची एक नवीन ऑपरेटिंग सिस्टम लाँच करू शकतात. याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा देखील सुरु आहे. ही ऑपरेटिंग सिस्टम व्हर्च्युअल, ऑगमेंटेड आणि मिक्स्ड रिअॅलिटी अनुभवांसाठी असेल. यामध्ये, Gemini AI कोरमध्ये ठेवले जाईल. ही सिस्टम विशेषतः हेडसेट आणि स्मार्ट ग्लासेस सारख्या डिवाइसेसाठी डिझाइन केलेली आहे आणि ती Apple आणि Meta शी स्पर्धा करण्यासाठी सज्ज आहे. गुगलच्या या आगामी ईव्हेंटबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. त्यामुळे आता या आगामी ईव्हेंटबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.