Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हॅलो- हॅलो, आवाज येत नाहीये? वारंवार कॉल ड्रॉप होतोय? मग, तुमच्यासाठी मोलाच्या ठरतील या Tech Tips

Tech Tips: कॉल आलाय? हॅलो - हॅलो करताय? पण आवाजच येत नाहीये? तुमचा कॉल देखील वारंवार ड्रॉप होतोय का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुमच्या या समस्येवर या लेखातील टेक टीप्स नक्कीच फायद्याच्या ठरू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 13, 2025 | 07:45 PM
हॅलो- हॅलो, आवाज येत नाहीये? वारंवार कॉल ड्रॉप होतोय? मग, तुमच्यासाठी मोलाच्या ठरतील या Tech Tips

हॅलो- हॅलो, आवाज येत नाहीये? वारंवार कॉल ड्रॉप होतोय? मग, तुमच्यासाठी मोलाच्या ठरतील या Tech Tips

Follow Us
Close
Follow Us:

दिवसभरात आपण अनेक लोकांना कॉल करतो. पण एखाद्या व्यक्तिला कॉल लागला नाही किंवा कॉलवर आवाज येत नसेल तर आपली चिडचिड होते. जर एखादी इमरजेंसीची परिस्थिती असेल आणि अशावेळी कॉल ड्रॉप झाला तर तळपायाची आग मस्तकात जाते. खराब नेटवर्क किंवा कॉल ड्रॉपच्या समस्येमुळे अनेकदा आपली कामं अडकतात. अनेकदा कॉल ड्रॉप होताना आपल्याला मोठ्या – मोठ्याने हॅलो – हॅलो असं देखील ओरडावं लागतं. तुम्ही देखील अशा समस्यांचा सामना करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत Apple युजर्स! iPhone आणि iPad वापरणाऱ्यांसाठी सरकारने दिली Warning, ताबडतोब करा हे काम

कॉलवर बोलताना काही गोष्टींची काळजी घेणं आणि तपासणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वारंवार कॉल ड्रॉप होण्याच्या समस्येने तुम्ही वैतागला असाल तर आता आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या ट्रीक्स घेऊन आलो आहोत. या ट्रीक्सच्या मदतीने कॉल ड्रॉप होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

कॉल ड्रॉप का होतो?

कॉल ड्रॉप होण्याची अनेक कारणं असू शकतात. जर तुमचा नेटवर्क किंवा सिग्नल कमजोर असेल तर तुमचा कॉल ड्रॉप होऊ शकतो आणि तुमचं फोनवरील बोलणं अपूर्ण राहू शकतं. एकाच वेळी एकाच सेल टॉवरशी एकापेक्षा जास्त यूजर जोडलेले असल्याने देखील ही समस्या उद्भवते. शिवाय, फोनच्या सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअरमध्ये बिघाड असल्यास देखील कॉल ड्रॉप सारख्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. या समस्येपाससून वाचण्यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स फॉलो करू शकता.

कॉल ड्रॉपपासून वाचण्यासाठी फॉलो करा या टीप्स

नेटवर्क कवरेज चेक करा

कमकुवत सिग्नल एरिया टाळण्यासाठी तुमचे लोकेशन तपासा. जर सिग्नल कमकुवत असेल तर चांगले नेटवर्क असलेल्या भागात जा, ज्यामुळे तुम्हाला कॉलिंगमध्ये समस्या येणार नाहीत.

फोनचे सॉफ्टवेयर अपडेट रखें

बऱ्याचदा, सॉफ्टवेअर अपडेट्समुळे फोनच्या नेटवर्क कनेक्टिव्हिटी समस्या दूर होतात. तुम्ही तुमचा फोन नेहमी अपडेट ठेवावा.

नेटवर्क मोड चेक करा

नेहमी योग्य नेटवर्क मोडवर रहा. जर तुमचा फोन 4G ला सपोर्ट करत असेल, तर नेटवर्कवरील भार कमी करण्यासाठी तो 4G मोडवर सेट करा.

फोनची सेटिंग्स रीसेट करा

जर कॉल वारंवार ड्रॉप होत असतील तर फोनची नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करा. हे अनेकदा कनेक्टिव्हिटी समस्यांचे निराकरण करते.

Upcoming Smartphones: या आठवड्यात लाँच होणार हे 3 जबरदस्त Smartphones! Samsung च्या सर्वात पातळ फोनचाही आहे समावेश

हँडसेट आणि सिग्नल इंटरफेरेंस चेक करा

तुमचा फोन अशा ठिकाणी ठेवा जिथे सिग्नलमध्ये अडथळा येत नाही. काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस किंवा भिंती सिग्नलमध्ये व्यत्यय आणू शकतात. या सोप्या टिप्सचा अवलंब करून, तुम्ही कॉल ड्रॉप्सची समस्या बऱ्याच प्रमाणात सोडवू शकता आणि तुमचं कॉलवरील संभाषण पूर्ण करू शकता.

Web Title: Your voice is not audible on phone how to solve call drop problem know some easy tech tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

iPhone 17 मॉडेल्स की समस्यांचा भंडार! युजर्सना येताय एकामागून एक समस्या, कंपनीने काय सांगितलं?
1

iPhone 17 मॉडेल्स की समस्यांचा भंडार! युजर्सना येताय एकामागून एक समस्या, कंपनीने काय सांगितलं?

Apple iPhone 18 Update: अपकमिंग आयफोन सिरीजबाबत समोर आली मोठी अपडेट! 2026 मध्ये नाही होणार लाँच, केवळ हेच मॉडेल्स घेणार एंट्री
2

Apple iPhone 18 Update: अपकमिंग आयफोन सिरीजबाबत समोर आली मोठी अपडेट! 2026 मध्ये नाही होणार लाँच, केवळ हेच मॉडेल्स घेणार एंट्री

Flipkart – Amazon Sale 2025: सेलमध्ये खरेदी केलेला iPhone असली की नकली? अनेक ग्राहकांसोबत झाली गडबड, असं करा चेक
3

Flipkart – Amazon Sale 2025: सेलमध्ये खरेदी केलेला iPhone असली की नकली? अनेक ग्राहकांसोबत झाली गडबड, असं करा चेक

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपचे हे हिडीन फिचर्स एकदा वापरून तर बघा! मित्रांसोबत चॅटिंग होईल आणखी मजेदार
4

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपचे हे हिडीन फिचर्स एकदा वापरून तर बघा! मित्रांसोबत चॅटिंग होईल आणखी मजेदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.