हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत Apple युजर्स! iPhone आणि iPad वापरणाऱ्यांसाठी सरकारने दिली Warning, ताबडतोब करा हे काम
तुम्ही देखील आयफोन आणि आयपॅड युजर्स आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आयफोन आणि आयपॅड युजर्ससाठी सरकारने वॉर्निंग जारी केली आहे. इंडियन कंप्यूटर इमरजेंसी रिस्पांस टीम म्हणजेच CERT-In ने 12 मे रोजी आयफोन आणि आयपॅड युजर्ससाठी एक वॉर्निंग जारी केली आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की, आयफोन आणि आयपॅड युजर्सना टार्गेट केलं जात आहे. त्यामुळे युजर्सनी सुरक्षित राहण्यासाठी काही प्रोसेस फॉलो करणं अत्यंत गरेजचं आहे.
CERT-In नुसार iOS आणि iPadOS मध्ये मोठी त्रुटी आढळली आहे. ही त्रुटी Darwin Notifications सह जोडलेली आहे, जे कंपनीच्या ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच OS सह CoreOS लेयरचा एक भाग आहे. यामध्ये कोणताही अॅप कोणत्याही परवानगीशिवाय सिस्टम नोटिफिकेशन अॅक्सेस करू शकतो आणि ट्रांसमिट म्हणजेच कोणालाही पाठवू शकतो. या त्रुटीचा फायदा घेऊन, हॅकर्स धोकादायक अॅपद्वारे डिव्हाइसला लक्ष्य करू शकतात आणि ते क्रॅश देखील करू शकतात. त्यामुळे युजर्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. याशिवाय युजर्सची महत्त्वाची माहिती देखील लिक होण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
CERT-In ने रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, हा धोका लेटेस्ट iPhone 16 पासून जुन्या iPhone आणि iPad मॉडल्सपर्यंत अनेक डिव्हाईसला आहे. जे डिव्हाईसच्या जुन्या सॉफ्टवेयर वर्जनवर काम करत आहेत, त्यांच्यासाठी हा धोका मोठ्या प्रमाणात आहे. जर तुम्ही iOS 18.3 च्या पूर्वीच्या वर्जनवर तुमच्या आयफोनचा वापर करत असाल तर तुम्ही हॅकर्सच्या निशाण्यावर आहात.
याव्यतिरिक्त, iPadOS 17.7.3 च्या आधीच्या आवृत्त्यांवर चालणारे iPads, ज्यामध्ये iPad Pro 12.9” 2nd Gen, iPad Pro 10.5”, iPad 6th Gen यांचा समावेश आहे, ते देखील धोक्यात आहेत. iPadOS 18.3 च्या आधीच्या आवृत्त्यांवर चालणारे iPads, जसे की iPad Pro 13”, iPad Pro 12.9” 3rd Gen आणि नंतरचे मॉडेल, iPad Pro 11” 1st Gen आणि नंतरचे मॉडेल, iPad Air 3rd Gen आणि नंतरचे मॉडेल, iPad 7th Gen आणि नंतरचे मॉडेल, iPad mini 5th Gen आणि नंतरचे मॉडेल देखील धोक्यात आहेत. त्यामुळे जर आता तुम्ही यातील कोणतेही मॉडेल वापरत असाल तर तुम्ही धोक्यात आहे. तुमचा डेटा धोक्यात आहे.