INS Trishul : भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस त्रिशुल फ्रान्समध्ये दाखल झाली आहे. येथे वरुण युद्धसरावादरम्यान दोन्ही देशांचे नौसैनिक युद्धाअभ्यास करतील. यावेळी दोन्ही देशांमध्ये विविध गोष्टींचे आदान-प्रदान करण्यात येणार आहे.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले की, गेल्या ११ वर्षांत भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात अभूतपूर्व वाढ झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन ६ पटीने वाढले आहे.
देशभरातील १० राज्यांमध्ये स्थापन झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर ईएमसी २.० प्रकल्पांमधून अंदाजे १.८० लाख नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पांमध्ये एकूण १,४६,८४६ कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे
आर्थिक वर्ष २५ मध्ये भारतात मोबाईल फोनचे उत्पादन ६५ अब्ज डॉलर्स इतके होते, ज्याची निर्यात २४ अब्ज डॉलर्स इतकी होती. अॅपलसारख्या मोठ्या कंपन्या भारतात उत्पादन वाढवत आहेत, उत्पादन क्षमतेच्या फक्त…