इलेक्ट्रॉनिक्स मार्केटला जीएसटी कपातीमुळे 'अच्छे दिन'; सणासुदीच्या काळात विक्रमी खरेदीचा अंदाज
मुंबई : केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीमध्ये सुधारणा केली आहे. यामुळे अनेक वस्तूंच्या किमती आता कमी होणार आहेत. त्यात 43 इंच आणि त्याहून मोठ्या एलईडी टीव्ही आणि एअर कंडिशनरवरील जीएसटी 28% वरून 18% पर्यंत कमी करण्याची भेट दिल्याने इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठाला ऐन सणासुदीच्या दिवसांत ‘अच्छे दिन’ येणार आहेत.
गेल्यावर्षीच्या तुलनेत, विक्रेत्यांना या दसऱ्याला विक्रीत 20 ते 25 टक्के वाढ अपेक्षित आहे. जीएसटी कमी झाल्याची बातमी मिळताच, ग्राहक बुकिंगसाठी इलेक्ट्रॉनिक्स शोरूममध्ये पोहोचत आहेत. नवरात्रीत डिलिव्हरी घेण्याचा अनेकांचा बेत दिसत आहेत. विक्रेते जीएसटी कपातीला ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठी फायद्याचे म्हणत आहेत. जीएसटीमुळे आतापर्यंत मागे हटलेले ग्राहक आता बाजारात येत आहेत. एसी, स्मार्ट टीव्ही, डिशवॉशरसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरील जीएसटी कमी केल्यामुळे ग्राहकांचे 4000 ते 5000 रुपये वाचतील.
हेदेखील वाचा : GST News: करचोरी रोखण्यापासून ते महागाई पर्यंत; नव्या GSTचे काय आहेत चार प्रमुख फायदे?
10 टक्के सवलतीमुळे बाजारपेठेत उत्साह वाढला आहे. या कपातीमुळे या दसऱ्यात खूप आशा निर्माण झाल्या आहेत. त्याचा परिणाम बाजारात आधीच दिसून येत आहे. या सवलतीसोबतच, नवरात्र सुरू होताच, इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या आकर्षक ऑफर्स देखील सुरू करतील, ज्याचा थेट फायदा ग्राहकांना होईल. सध्या ग्राहक त्यांच्या आवडत्या उत्पादनांची निवड करत आहेत आणि बुकिंग करत आहेत. 22 सप्टेंबरनंतर शहरातील शोरूममध्ये अधिक गर्दी होईल, अशा अंदाज आहे.
बाजारात होईल पैशांचा पाऊस
सणापूर्वी सरकारने दिलेली ही भेट यंदा दिवाळीपूर्वीच दसऱ्यालाच पैशांचा पाऊस पाडेल. ऑफर्स सुरू होण्यापूर्वीच मिळालेल्या या सवलतीमुळे ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये सोयीसाठी नवरात्रीची तयारी जोरात सुरू आहे. बाजारात एसी. एलईडी, डिशवॉशरला चांगली उपलब्धता आहे.
चार ऐवजी दोन स्लॅबमध्ये विभागले दर
केंद्र सरकारने जीएसटीला ४ ऐवजी ५% आणि १८% अशा दोन स्लॅबमध्ये विभागले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील मागणी वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आह. २०१७ मध्ये लागू करण्यात आलेल्या जीएसटीचे उद्दिष्ट अप्रत्यक्ष कर प्रणाली सुलभ करणे होते. त्याचा, एक देश एक कर, कराच्या परिणामांवरील कर काढून टाकणे आणि सुलभ अनुपालन हा या जीएसटीचा उद्देश होता.
हेदेखील वाचा : इन्फोसिस शेअर्समध्ये 4 टक्यांची वाढ, बायबॅक घोषणेमुळे IT क्षेत्रात खरेदीचा ओघ