१९ वर्षांखालील विश्वचषकातील दारुण पराभवानंतर बीसीसीआय भारताच्या कामगिरीचा आढावा घेण्याचा विचार करत आहे. ज्यामध्ये स्पर्धेत ज्युनियर संघाच्या कामगिरीवर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सरफराज अहमदच्या एका विधानामुळे एक नवीन वाद निर्माण झाला आहे. सरफराज अहमदने भारतीय खेळाडूंवर अनैतिक वर्तनाचा आरोप केला आहे. भारतीय खेळाडूंनी खिलाडूवृत्ती दाखवली नाही असे सरफराजचे मत आहे.
सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. वैभव सूर्यवंशी हा बाद झाल्यानंतर वैभव आणि पाकिस्तानी गोलंदाज अली रझा यांच्यात जोरदार वाद झाला. रझाच्या आक्रमक सेलिब्रेशनमुळे वैभव अस्वस्थ झाला.