गोकुळबद्दलचं काल सविस्तरपणानं मी मुलाखत दिली, त्यावर मी काय पुन्हा बोलणार नाही.तर तो काल ऊस दराचं जे आंदोलन होतं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आणि इतर संघटनांचं ते मिटवण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर सोपवली होती. आणि काल मुंबईतन आल्यानंतर तीन-चार तास बैठक घेऊन आपण एकोणचाळीसशे रुपये एकरकमी उचल आणि कारखाने समाप्त झाल्यानंतर शंभर रुपये असा देण्याचा निर्णय झाला.
पंचेचाळीसशे रुपयेच्या वर साखर वर्षभर विकली तर दोनशे रुपये आणि त्याही पुढे गेली तर मग सत्तर-तीसचा फॉर्म्युला ते बसून आपण ठरवायचं असं ठरलेलं आहे. आणि मी अतिशय आभारी आहे या सगळ्या शेतकरी संघटनेचा, विशेषतः राजू शेट्टींचा की त्यांनी त्याला मान्यता दिली.सन्मानजनक तोडगा निघाल्याबद्दल त्यांनी सगळ्यांचे आभार मानले आणि विशेषतः दीपावलीच्या निमित्ताने तीन-चार दिवस ही जी वाहतूक कोंडी झालेली होती आणि अनेक लोक दिवाळीच्या निमित्ताने अडकून पडलेले होते, त्यांचीही दिवाळी गोड करण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मीही मनापासून त्यांचे आभार मानतो.