फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताच्या संघाच्या हाती एकदा विजय लागला तर दुसऱ्यांदा म्हणजेच १९ वर्षांखालील आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध निराशा लागली. भारतीय संघाने संपूर्ण सामन्यामध्ये एकही सामना न गमावता फायनलमध्ये प्रवेश केला होता पण फायनलमध्ये टीम इंडियाची फलंदाजी ढासळली आणि जेतेपद हातातून निसटले. पाकिस्तानने १९ वर्षांखालील आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतावर १९१ धावांनी विजय मिळवला. या विजयासह १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पाकिस्तान १९ वर्षांखालील आशिया कपचा विजेता बनला.
विजेतेपदानंतर, सरफराज अहमदच्या एका विधानामुळे एक नवीन वाद निर्माण झाला आहे. सरफराज अहमदने भारतीय खेळाडूंवर अनैतिक वर्तनाचा आरोप केला आहे. भारतीय खेळाडूंनी खिलाडूवृत्ती दाखवली नाही असे सरफराजचे मत आहे. सरफराज अहमद म्हणाला, “आम्ही यापूर्वी क्रिकेटचा आदर करणाऱ्या भारतीय संघांविरुद्ध खेळलो आहोत, परंतु या तरुण खेळाडूंनी ज्या पद्धतीने वागले ते खेळाचा अनादर करणारे होते. मी माझ्या खेळाडूंना स्पष्टपणे सांगितले की उत्सव सभ्य असावा. मला असे वाटत होते की मुलांनी या फॉरमॅटमध्ये त्यांची क्षमता दाखवावी. मी त्यांना स्वतःवर विश्वास ठेवावा आणि त्यांना जे करायचे आहे ते करू द्यावे असे सांगितले.”
अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, सरफराज त्याच्या खेळाडूंना सल्ला देताना दिसत आहे की, “तुम्ही अज्ञानी लोकांसोबत अज्ञानी व्यक्तीसारखे खेळू शकत नाही; तुम्ही सभ्यतेच्या मर्यादेत खेळले पाहिजे.” सुरुवातीला व्हिडिओची सत्यता स्पष्ट नव्हती, परंतु नंतर, पत्रकार परिषदेत, सरफराजने कबूल केले की ते शब्द त्याचे होते आणि अंतिम सामन्यादरम्यान त्याने भारतीय खेळाडूंच्या वर्तनावर प्रतिक्रिया दिली होती.
Sarfaraz Ahmed responded to his ongoing viral video saying ‘Jahilon kay Khilaf Jahilon Ki Tarah Nahi Khelna, Tameez Kay Dairay Me Khelna Hai’ VC: PCB#Cricket | #Pakistan | #SarfarazAhmed | #U19AsiaCup | #Islamabad pic.twitter.com/5354wuuYkb — Khel Shel (@khelshel) December 22, 2025
अशा परिस्थितीत, सरफराज अहमद भारतीय खेळाडूंना अज्ञानी म्हणत असताना, तो क्रीडा वृत्तीचीही अपेक्षा करत आहे. सरफराज स्वतः भारताविरुद्ध अनेक सामन्यांमध्ये खेळला आहे. त्याला भारत-पाकिस्तान सामन्याचे वातावरण देखील माहित आहे. सरफराजला त्याच्या खेळाडूंनी भारतीय संघाला चिथावणी द्यावी आणि कोणताही प्रतिसाद मिळू नये अशी इच्छा होती. विकेट पडल्यानंतर, पाकिस्तानी खेळाडूंनी प्रथम जोरदार उत्सव साजरा केला आणि नंतर वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांनी प्रतिसाद दिला. अशा परिस्थितीत, त्यांच्यावर अनैतिक वर्तनाचा आरोप करताना सरफराजला लाज वाटली पाहिजे.






