मागणीच्या तुलनेत आवक अधिक झाल्याने टोमॅटो आणि शेवगा यांच्या भावात घसरण नोंदविण्यात आली, तर काकडीच्या भावात वाढ झाली. इतर बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
बफर स्टॉकमधून सुमारे 25 टन कांदे सहकारी संस्था नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भांडार यांच्यामार्फत विकला जाईल. केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी ही माहिती दिली.