मार्केटयार्डात भाजीपाला-फळांच्या दरात चढ-उतार! काकडी, डाळींब व फुलांना बाजारात वाढती मागणी
गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली होती. मागणीच्या तुलनेत आवक अधिक झाल्याने टोमॅटो आणि शेवगा यांच्या भावात घसरण नोंदविण्यात आली, तर काकडीच्या भावात वाढ झाली. इतर बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.(फोटो सौजन्य – istock)
कोथिंबीरला कवडीमोल भाव, जनावरे पिकात सोडले; शेतकरी मोठ्या संकटात
परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, मध्यप्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे १२ ते १३ टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ४ ते ५ टेम्पो, आंध्रप्रदेश व तामिळनाडू येथून शेवगा ३ ते ४ टेम्पो, राजस्थानातून गाजर सुमारे १४ ते १५ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ३ ते ४ टेम्पो, भुईमूग कर्नाटक व गुजरातमधून प्रत्येकी १ टेम्पो, मध्यप्रदेश व राजस्थानातून मटार २५ ते २६ टेम्पो, कर्नाटक येथून पावटा ३ टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी १ टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसूण सुमारे १० ते १२ टेम्पो, तर इंदौर, आग्रा व स्थानिक भागातून बटाटा ३० ते ३५ टेम्पो इतकी आवक झाली होती.
गुलटेकडी मार्केटयार्डात कोथिंबीर, शेपू व पुदिन्याच्या भावात वाढ झाली असून इतर सर्व पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याचे व्यापाऱ्याऱ्यांनी सांगितले, पालेभाज्यामध्ये कोथिंबिरीची सुमारे १ लाख जुडी, मेथी ६० हजार जुडी, तर हरभऱ्याची सुमारे १२ हजार जुडी आवक झाली. पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव (रुपये) कोथिंबीर १२००-२०००, मेथी ५००-८००, शेपू ५००-१०००, कादापात १०००-१५००, चाकवत ५००-८००, करडई ३००-८००, पुदिना ५००-१०००, अंबाडी ५००-८००, मुळे १०००-१५००, राजगिरा ५००-८००, चुका ५००-८००, चवळई ६००-१०००, पालक ८००-१५००, हरभरा गड्डी ५००-१०००, कांदा १००-१५०, बटाटा ७०-१४०, लसूण ५००-१२००, सातारी आले ३००-५००, भेंडी ३००-५००, गवार ७००-१०००, टोमॅटो १००-१५०, दोडका ३५०-४५०, हिरवी मिरची ५००-७५०, दुधी भोपळा १००-१५०, चवळी २००-३००, काकडी ४००-४५०, कारली (हिरवी) ४००-४५०, (पांढरी) ३००-३५०, पापडी ३००-३५०, पडवळ २००-२५०, फ्लॉवर १००-२००, कोबी ७०-१४०, वांगी २००-४००, डिंगरी ३५०-४००, नवलकोल १००-१२०, ढोबळी मिरची ४००-५००, तोंडली (कळी) ५००, (जाड) २००-२५०, शेवगा ५००-१०००, गाजर ५००-१०००, वालवर २५०-३००, बीट १००-२००, घेवडा ३००-४००, कोहळा १००-१५०, आर्वी २५०-३००, घोसावळे २००-२५०, ढेमसे २५०-३००, भुईमूग शेंग ७००-९००, मटार (परराज्य) २६०-३००, पावटा ३००-३५०, तांबडा भोपळा १००-२५०, तोतापुरी कैरी १८०० २०००, सुरण २००-२२०, मका कणीस ५०-१००, नारळ (शेकडा) १०००-१६०० एवढा भाव आहे.
Pune News: पुण्याची वाहतूक कोंडी सुटणार? ‘या’ मेट्रो लाईनच्या विस्ताराला गती
पुणे, गुलटेकडी मार्केटयाडांतील फुलबाजारात सर्व फुलांची आवक वाढली रथसप्तमी आहे. व प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढल्याने फुलांच्या दरात १० ते २० वाढ टक्क्यांनी झाल्याची माहिती फुलव्यापारी सागर भोसले यांनी दिली. झेंडू गुलछडी २०-६०, १५०-२००, अॅष्टर (जुडी) ३०-५०, सुट्टा १००-१५०, कापरी ६०-१००, शेवंती ६०-१२०, गुलाबगड्डी ३०-६०, गुलछडी काडी ५०-१५०, डच गुलाब (२० नग) १५०-३००, जर्बेरा ४०-६०, कार्नेशियन १५०-२५०, शेवंती काडी १५०-३००, लिलियम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्किड ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) ८०-१२०, जिप्सोफिला २५०-३५०, लीली इत्यादी फुलांना मोठी मागणी आहे.






